four people misbehaved with bengal monitor lizard in maharashtra forest arrested Dainik Gomantak
महाराष्ट्र

घोरपडीवर झालेला बलात्कार कसा समजला? वाचा सविस्तर

आरोपींनी घोरपडीवर केलेल्या आत्याचाराची कबुली दिली नाही

दैनिक गोमन्तक

चांदोली राष्ट्रीय उद्यानात बंगाल मॉनिटर लिझर्ड या घोरपडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. काही प्राण्यांची शिकार झाल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करून जामीनावर सोडण्यात आलय. चांदोली राष्ट्रीय उद्यानातल्या वनपरिक्षेत्रात अखिल भारतीय व्याघ्र गननेसाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यांची पाहणी करत असताना गोठणे नियत क्षेत्रातल्या मार्लेश्वर सडा या पाऊलवाटेवरील ट्रॅप कॅमेरा चोरीला गेल्याची माहिती वनविभागाला मिळाली.

दरम्यान, समोरच असलेल्या दुसऱ्या कॅमेऱ्यात काही संशयास्पद लोकांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. हे लोक शस्त्रांसह शिकारीसाठी फिरताना दिसून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस (police) पथकाने गोठणे परिसरातील हातीव गावात कसून चौकशी केल्यानंतर एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

दुसऱ्या दिवशी रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील मारळ गावातून दोन आरोपींना ताब्यात घेतले. अजून एका आरोपीला पकडण्यात आले आहे. यामध्ये संदीप तुकाराम पवार, मंगेश कामठेकर, अक्षय कामठेकर आणि रमेश घाग अशी आरोपींची नाव आहेत.

या आरोपींच्या मोबईलमध्ये शिकार केलेले फोटो मिळाले आहेत. या शिकारीमध्ये साळिंदर, पिसुरी हरण, ससा, पेंगोलिन या प्राण्यांच्या शिकारीचे फोटो आहेत. पण या आरोपींनी घोरपडीवर केलेल्या आत्याचाराची (rape) कबुली दिली नाही. अशी माहिती चांदोली वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यास कायदा 1972 अन्वये पाच लाख रुपये दंड किंवा सात वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. तसेच हे आरोपी दोषी ठरल्यास कलम 377 अन्वये नैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT