police  Dainik Gomantak
महाराष्ट्र

परराज्यातील लोक महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात - गुप्तचर विभाग

पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला केली सुरुवात

Sumit Tambekar

मुंबई:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत राज्य सरकारला इशारा दिला आहे. तीन मे पर्यंत ईद असल्याने आम्ही काही हालचाली करणार नाहीत असे म्हणत चार मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर राज्यभरात मनसेकडून आंदोलन करण्यात येईल असे म्हणाले. या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा अलर्ट गुप्तचर विभागाने दिला आहे. (Foreigners can disturb law and order in Maharashtra )

1 मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेत 12 अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला 6 अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम 116, 117, 152 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे असले तरी राज ठाकरे ही हे आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. भोंगे हा सामाजिक विषय आहे हा धार्मिक विषय नाही. असं म्हणत राज ठाकरेंनी एकदाच काय ते होऊन जाऊद्या असा इशारा औरंगाबादच्या सभेत दिला. 4 मेपासून ऐकणार नाही असंही राज ठाकरे म्हणाले.

मनसेच्या अल्टीमेटमला काही तास शिल्लक असताना राज्यात राजकीय हालचाली बैठका वाढल्या आहेत. शिवतीर्थ इथं मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भोंगे हटवण्याबाबतच्या आंदोलनावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT