Air Vistara Dainik Gomantak
महाराष्ट्र

Air Vistara: अबू धाबी-मुंबई प्रवासात महिलेचा धिंगाणा, वाचा संपुर्ण प्रकरण

Air Vistara: अबु-धाबीहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका 45 वर्षीय महिलेने गोंधळ घातला.

दैनिक गोमन्तक

Air Vistara: विमानात गैरवर्तनाच्या घटना दिवसेंदिवस समोर योत आहे. अबू धाबी ते मुंबई विमान प्रवासात एका परदेशी महिलेला बिसनेस क्लासमधील आसनावरून विमानातील क्रू मेंबरने उठवल्यामुळे महिलेने गोंधळ घातला. आरोपी महिला ही कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकली. यानंतर तिने त्याला मारहाण देखील केली.

एवढेच नाही तर विमानामध्ये अर्धनग्न फिरत धिंगाणा घातला. विमानातील कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून या महिलेविरुद्ध सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४५ वर्षाच्या पाओला पेरूचियो असे आरोपी महिलेचे नाव असून ती इटली येथील रहिवाशी आहे. तिला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी पहाटे घडली.

पोलिसांनी (Police) दिलेल्या महितीनुसार एअर विस्तारा च्या uk256 या विमानात हा प्रकार घडला. हे विमान रविवारी अबू धाबी येथून मुंबईला (Mumbai) येत होते. या विमानाने रात्री 2 वाजता उड्डाण घेतले.

पाओला ही इकॉनॉमी क्लासचे तिकीट घेऊन बिझनेस क्लासमध्ये बसण्यासाठी गोंधळ घालत होती. मात्र, तिला विमानातील क्रू मेंबरने रोखले. यामुळे तिला राग आला. तिने विमानताच विमानातील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

एवढेच नाही तर ती त्याच्या अंगावर महिला थुंकली आहे. यानंतर अर्धनग्न अवस्थेत विमानात फिरून तिने गोंधळ घातला. इतर प्रवाशांना त्रास होत असल्याने सर्व कर्मचारी तिला शांत राहण्याचे आवाहन करत होते.

पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. वैमानिकानेही त्या महिलेला शांत राहण्यास सांगितले. अखेर मुंबईत विमान उतरल्यानंतर त्या महिलेला विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आले.

कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून महिलेविरोधात विमान अधिनियम 1937 कलम 22,23 नुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT