Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: 50 फुटांचा भाग वाहून गेला; वाहतुकीला ब्रेक

मुंबई-गोवा (Mumbai-Goa Highway) वाहतूक खंडित होण्याची शक्यता; एक वाहन जाण्याएवढीच जागा

दैनिक गोमन्तक

अलिबाग : मुसळधार पावसाने महाड तालुक्यातील सावित्री पुलाच्या अलीकडे मुंबई-गोवा (Mumbai-Goa Highway)महामार्गालगतचा मातीचा भराव वाहून गेल्याने भलेमोठे भगदाड पडले आहे. केवळ एक चारचाकी वाहन जाईल इतकाच महामार्गाचा भाग उरला आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे; मात्र पाऊस आणि रहदारीमुळे कामामध्ये अनेक अडचणी येत आहेत. (Floods on Savitri River washed away 50 percent part of Mumbai-Goa highway)

सावित्री नदीला आलेल्या महापुरात महामार्गाचा हा भाग वाहून गेला. भरावाची माती वाहून गेल्याने डांबरीकरणालाही तडे गेले. वरून चकाचक दिसणाऱ्या महामार्गाचा साधारण 50 फुटांचा भाग वाहून गेला आहे. केवळ 10 फुटांचा अरुंद भाग शिल्लक आहे. या भागावरून एका वेळी एकच वाहन जाऊ शकते. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहन गेल्यास शिल्लक राहिलेला भागदेखील कोसळून जाण्याची शक्यता या मार्गावरून जाताना वाहनचालकांना जाणवत आहे; मात्र महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी याचे सर्व खापर पावसावर फोडत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

करोडो रुपये खर्च करून आणि जो मार्ग कोणत्याही परिस्थितीत शाबूत राहील याची ग्वाही अधिकारी देत असताना पुरात वाहून गेला आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न ठेवल्याने डोंगरावरून येणाऱ्या पाण्याला जागाच राहिली नाही. त्याच वेळेला सावित्री नदीच्या प्रवाहाने कमकुवत झालेली भरावाची माती वाहून गेली. या मार्गासाठी पर्यायी मार्ग नसल्याने लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे; अन्यथा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

"महामार्गाचा वाहून गेलेला भाग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कामास लावलेली आहे. हा मार्ग लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न आहेत. तरीही पडणारा पाऊस आणि भरावासाठी माती नसल्याने समस्या जाणवत आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत हा मार्ग व्यवस्थित होईल."

- श्रीकांत बांगर, कार्यकारी अभियंता- राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, पेण

"पुरामध्ये सावित्री नदीपुलाच्या अलीकडील भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता. पाण्याचा जोर जबरदस्त होता. यामुळे मातीचा भराव वाहून गेला. रस्त्याखालील माती वाहून गेल्याने वरील डांबरीकरणाचा भागदेखील कोसळला. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न मिळाल्याने हा रस्ता खचला असावा."

- अस्लम मुकादम, चालक-महाड

दोन लाखांचे नुकसान

मुंबई - गोवा महामार्गावरील वासिष्ठी, एनरॉन पुलासह पशुराम घाटही खचला आहे. त्यामुळे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. पशुराम घाटात पर्यायी मार्ग तयार करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. मात्र अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक अजूनही बंदच आहे. आंबा घाटातील दरड काढण्यासाठी अजून एक दिवस लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजीपाला, दूध यासह पेट्रोल-डिझेलचा तुटवडा रत्नागिरीत जाणवत आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील ओझरे येथे दरड कोसळून एका शेतकऱ्यांचा गोठा उद्‌ध्वस्त झाला. त्यातील चार जनावरे मृत पावली आहेत. यामध्ये दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT