Few coaches of 11061 LTT-Jaynagar Express have been derailed between Lahavit and Devlali today ANI
महाराष्ट्र

नाशिकजवळ रेल्वे अपघात, एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले

ही घटना आज दुपारी लहवित ते देवळाली दरम्यान घडली.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) नाशिकजवळ (Nashik) आज रेल्वे अपघात झाला आहे. एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे (LTT-Jaynagar Express) अनेक डबे रुळावरून घसरल्याने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. एलटीटी-जयनगर एक्स्प्रेस मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बिहारमधील जयनगरकडे जात होती. यादरम्यान ट्रेन रुळावरून घसरली. त्याचे काही डबे रुळावरून घसरले. या घटनेनंतर घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना आज दुपारी 3.10 च्या सुमारास लहवित ते देवळाली दरम्यान घडली.

घटनेची माहिती मिळताच अपघात निवारण गाडी आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या. मध्य रेल्वेच्या सीपीआरओने ही माहिती दिली आहे. सीपीआरओ-सीआरने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचे सुमारे 10 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या इतर गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही मार्गावरील रेल्वे वाहतूक वळवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT