Esakal Dainik Gomantak
महाराष्ट्र

Esakal: विश्वासार्हतेचा विजय! मराठी मनाचा मानबिंदू आता डिजिटलचाही 'राजा'; 5.6 कोटी युजर्ससह ई-सकाळ नंबर-1

ESakal Comscore: विश्वास आणि पारदर्शकता हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असते आणि असा पाया असलेला वारसा काळाच्या कोणत्याही कसोटीवर नेहमीच यशस्वी ठरतो.

Manish Jadhav

Esakal No 1: विश्वास आणि पारदर्शकता हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असते आणि असा पाया असलेला वारसा काळाच्या कोणत्याही कसोटीवर नेहमीच यशस्वी ठरतो. मराठी पत्रकारितेच्या इतिहासात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या 'सकाळ'ने डिजिटल युगातही आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. 'कॉमस्कोर'च्या डिसेंबर 2025 च्या ताज्या आकडेवारीनुसार, 'ई-सकाळ' (eSakal.com) 5.6 कोटी युजर्ससह संपूर्ण मराठी डिजिटल न्यूज इकोसिस्टममध्ये दिमाखात 'नंबर 1' च्या स्थानी विराजमान झाले. हे केवळ आकडेवारीचे यश नसून, 'सकाळ' या ब्रँडने जपलेल्या विश्वासार्ह पत्रकारितेचे आणि वाचकांनी दाखवलेल्या अढळ विश्वासाचे जिवंत उदाहरण आहे.

आजच्या वेगवान डिजिटल जगात जिथे माहितीची विश्वासार्हता तपासणे मोठे आव्हान असते, तिथे 5.6 कोटी युजर्सनी 'ई-सकाळ'ला आपली पहिली पसंती दिली आहे. हे यश अधोरेखित करते की, मराठी वाचक आजही बातम्यांच्या गुणवत्तेला आणि सत्यतेला सर्वोच्च प्राधान्य देतो. सकाळने आपल्या समृद्ध वारशाची सांगड आधुनिक तंत्रज्ञानाशी घातल्यामुळेच, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील मराठी भाषिक या व्यासपीठाशी जोडले गेले आहेत. दशकांपासून पिढ्यानपिढ्या ज्या ब्रँडवर विश्वास ठेवत आल्या, त्याच ब्रँडने आज डिजिटल विश्वातही आपले 'नंबर 1' चे स्थान टिकवून एक नवा इतिहास रचला आहे.

व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिल्यास जाहिरातदार आणि नामांकित ब्रँड्ससाठी ई-सकाळचे हे अव्वल स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरत आहे. 5.6 कोटी युजर्सचा हा प्रचंड मोठा आकडा आणि त्यासोबत असलेला वाचकांचा सक्रिय सहभाग, कोणत्याही ब्रँडला मोठी व्याप्ती मिळवून देण्यासाठी सक्षम आहे. एका अशा वारसा लाभलेल्या माध्यम समूहासोबत भागीदारी करणे, ज्यावर लोकांचा मनापासून विश्वास आहे. जेव्हा एखादा ब्रँड ई-सकाळसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठाशी जोडला जातो, तेव्हा त्याला केवळ प्रेक्षकच मिळत नाहीत, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या विश्वासाची जोडही मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT