Chief Minister Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Eknath Shinde: हस्तक्षेप केला असता तर शिवाजी पार्क आम्हालाच मिळाले असते!

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली बीकेसी मैदानाची पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

शिवाजी पार्क तथा शिवतीर्थावर दसऱ्यादिवशी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच मेळावा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर बोलताना, जर मी या विषयात हस्तक्षेप केला असता तर शिवतीर्थावर आमचाच मेळावा झाला असता, असे वक्तव्य केले आहे.

शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. या मैदानाची पाहणी शिंदे यांनी केली, यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून मी परवानगी देताना हस्तक्षेप केला नाही. मी हस्तक्षेप केला असता तर आमचा मेळावा शिवतीर्थावर झाला असता. न्यायालयाच्या निर्णायाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, तथापि, मी मुख्यमंत्री आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी माझी आहे.

न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. त्यामुळे आमचा मेळावा बीकेसीमध्येच घेण्याचे ठरवले. मैदान कोणतेही असो, आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचे विचार पोहचवायचे आहेत. सदा सरवणकर आणि ठाकरे गटानेही शिवतीर्थावर दसऱा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. पण दोघांनाही प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यावरून परवानगी नाकारली होती. 'ते' (ठाकरे गट) हायकोर्टात गेले, त्यानंतर त्यांना परवानगी दिली गेली.

शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. मेळाव्यात पक्षप्रमुख शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असतात. पण यंदा शिंदे गटाकडूनही दसरा मेळावा घेणार असल्याचे सांगत या मैदानावर दावा करण्यात आला होता.

त्यासाठी शिंदे गटाकडूनही अर्ज करण्यात आला होता. मुंबई न्यायालयाने दोन्ही गटाचे दावे ऐकून ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला होता. त्याआधी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. ठाकरे गट आणि शिंदे गटातील अद्याप इतर काही निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तरा काही निर्णयावर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT