Shinde Vs Thackeray|shiv sena bhawan Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shinde Vs Thackeray: ठाकरेंना आणखी एक धक्का? शिंदे गट उभारणार नवे 'शिवसेना भवन'

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची इमारत आणखी प्रशस्त होणार असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. एकनाथ शिंदे नवीन शिवसेना भवन बांधणार आहेत. खर्‍या शिवसेनेवरून दोन गटात आधीच लढत सुरू आहे. शिंदे गटानेही पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. आता एकनाथ शिंदे शिवसेनेची नवी इमारत बांधून उद्धव ठाकरेंच्या अडचणीमध्ये वाढ करणार आहे. शिवसेनेची नवी इमारत उद्धव गटाच्या शिवसेनेच्या इमारतीपासून 500 ते 600 मीटर अंतरावर असेल.

मुख्य कार्यालय मुंबईतील (Mumbai) दादर परिसरातील रुबी मिलजवळ व्हिस्टा सेंट्रल नावाच्या इमारतीत असू शकते. दादर परिसर हा शिवसेनेचा (ShivSena) बालेकिल्ला मानला जातो. मुंबईबाहेरील कामगारांसाठीही हे एक परिचित नाव आहे. त्यामुळेच दादरमध्येच नवे शिवसेना भवन (Shiv Sena Bhawan) बांधले जाणार आहे. या निर्णयावर एकनाथ शिंदे अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत. नवीन इमारत आणखी प्रशस्त होणार असल्याचे बोलले जात आहे.

* शिवसेनेत बंडखोरी होऊन दोन गट निर्माण झाले

शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात दोन गट पडले होते. एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपशी संबंध जोडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार पाडले होते. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनीही स्वतःला खरी शिवसेना असल्याचे सांगून पक्षाच्या झेंडा आणि चिन्हावर दावा केला होता. हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले.

* ईसीने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले

शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याची मागणी केली होती. त्यांनी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेतील मान्यतेचा हवाला दिला होता. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांना 8 ऑगस्टपर्यंत त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.

* सर्वोच्च न्यायालयानेही भाष्य केले

8 ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने चिन्हावरील दाव्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. निवडणूक आयोगाने आता त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी 23 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना मानून पक्षाचे निवडणूक चिन्ह देण्यात यावे, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाला तातडीने कारवाई करू नये, असे सांगितले होते. कारण बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT