Four students drowned to death in Chaskaman Dam in Khed Tehsil of Pune district ANI
महाराष्ट्र

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार शाळकरी मुलांसह आठ जण धरणात बुडाले, एक मुलगी बेपत्ता

मुली पाण्यात जाऊन फोटो काढत असताना लाटेने वाहून गेल्या. या घटनेतून बचावलेल्या सहा वर्षाच्या मुलाने लोकांना बोलावले.

दैनिक गोमन्तक

पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून आठ जणांचा मृत्यू झाला. मात्र, एक मुलगी अद्याप बेपत्ता आहे. पहिली घटना पुण्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणाची आहे, जिथे चार मुलींचा बुडून मृत्यू झाला तर एक बेपत्ता झाली. दुसरीकडे, दुसरी घटना खेड तालुक्यातील चासकमान भागातील असून, जलाशयात बुडून दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.(Eight people drowned in Pune)

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना भोर तालुक्यातील असून,त्या पाच मुली एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊन नारेगावला जात होत्या. यादरम्यान संध्याकाळी त्या भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या. यादरम्यान पाचही जणी बुडाल्या. मृतांमध्ये 19 ते 23 वयोगटातील चार मुलींचा समावेश आहे. तेथे एक 20 वर्षीय तरुणी बेपत्ता आहे.

19 वर्षीय खुशबू लंकेश राजपूत, 20 वर्षीय मनीषा राजपूत, 21 वर्षीय चांदनी राजपूत, 22 वर्षीय पूनम राजपूत अशी मृत मुलींची नावे आहेत आणि बेपत्ता झालेल्या मुलीची नावे मोनिका चव्हाण आहे जी 23 वर्षाची होती. अग्निशमन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुली पाण्यात जाऊन फोटो काढत असताना एका लाटेने त्या वाहून गेल्या. या घटनेतून बचावलेल्या सहा वर्षाच्या मुलाने नंतर आजूबाजूच्या लोकांना बोलावले. यानंतर स्थानिक लोकांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली.

दुसरीकडे, दुसऱ्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील चासकमान धरणाजवळ असलेल्या निवासी शाळेतील चार विद्यार्थी, दोन मुले आणि दोन मुली यांचा बुडून मृत्यू झाला. काही मुलांचा ग्रुप छोट्या पिकनिकला गेला होता. यावेळी शाळेतील शिक्षकही उपस्थित होते. मुले आंघोळीसाठी धरणात उतरली. मात्र त्यांना पाण्याची खोली कळत नसल्याने चौघेही बुडाले. पोलिसांनी चारही मृतदेह बाहेर काढले. रितीन दीदी, नव्या भोसले, परीक्षित अग्रवाल आणि तनिष्क देसाई अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT