लुकआउट नोटीस Lookout notice जारी झाल्यानंतर देशमुख यापुढे देश सोडू शकत नाहीत.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

अनिल देशमुख यांना ED ची लुकआऊट नोटीस

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी पदाचा गैरवापर केला. मुंबईतील विविध 'बार' आणि रेस्टॉरंटमधून मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्या माध्यमातून 4.70 कोटी रुपये उकळले.

दैनिक गोमन्तक

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात ‘लुकआऊट नोटीस’ (Lookout notice) जारी केली आहे. लुकआउट नोटीस जारी झाल्यानंतर देशमुख यापुढे देश सोडू शकत नाहीत. अनिल देशमुख यांना या प्रकरणात ईडीने पाच वेळा समन्स बजावले आहे. तरी देशमुख हे ED समोर हजर झाले नाहीत. ईडीचे म्हणणे आहे की, अनिल देशमुख यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधला जात नाही. ते कुठे आहे याची आम्हाला कल्पना नाही.

100 कोटी वसुली प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने जारी केलेल्या समन्सविरोधात अनिल देशमुख यांनी 2 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यात हे रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या एकल खंडपीठासमोर ही याचिका आली होती. परंतु त्यांनी कोणतेही कारण न देता सुनावणीपासून स्वतःला दूर केले. याबाबत न्यायमूर्ती रेवती म्हणाल्या, सुनावणीसाठी माझ्या खंडपीठासमोर ठेवू नका. आता या संदर्भातील दुसऱ्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

भ्रष्टाचार आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी सीबीआयने 21 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात FIR नोंदवल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देशमुख आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध तपास सुरू केला होता. अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, अनिल देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी पदाचा गैरवापर केला. मुंबईतील विविध 'बार' आणि रेस्टॉरंटमधून मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्या माध्यमातून 4.70 कोटी रुपये उकळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT