Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

संजय राऊतांच्या संपत्तीला ईडीचं कुलूप

भाजप नेते किरीट सौमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजाकाण मागील काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पाश्वभूमीवर भाजप नेते किरीट सौमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला.

किरीट सैमय्या म्हणाले, ''आज शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत यांच्या अलिबागमधील जमीन, प्रॉपर्टी आणि दादरमधील प्लॅट ईडीने जप्त केला आहे. संजय राऊतांना माहिती असल्यामुळे त्यांनी ईडीला 55 लाख परत केले होते. परंतु ते आमच्यावर ज्यापध्दतीने आरोप करत आहेत, यावरुन त्यांची मानसिक स्थिती आम्ही समजू शकतो.''

संजय राऊत म्हणाले, ''मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर वाढला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांसंबंधी यापूर्वीच मी देशाचे उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांना पत्र लिहून खबर दिली होती. भारतीय जनता पक्षाचे नाचे महाराष्ट्रात गोंधळ करत आहेत. परंतु आम्ही कष्टाने कमावलेली संपत्ती आज ईडीने जप्त केली आहे. महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेला चांगलंच समजतय. तपास यंत्रणांच्या माध्यमातून केंद्र सरकार सू़ड उगवण्याचा प्रयत्न करत आहे. मी एक रुपयाही गैरमार्गाने कमावलेला नाही. परंतु माझं घर जप्त करण्यापूर्वी ईडीने नोटीस का पाठवली नाही? ईडीला कितीही उड्या मारुद्या, ते तोंडावर पडणार आहेत. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी मी भारतीय जनता पक्षाला मदत करत नाही म्हणून केंद्रातील मोदी सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाया करत आहे. त्याचबरोबर ईडीने केलेले आरोप सिध्द झाले तर मी समाजकारण, राजकारण सोडेन.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT