Goa Express Dainik Gomantak
महाराष्ट्र

Goa Express: खंडोबा पावला! दिल्ली - गोवा एक्सप्रेस जेजुरी रेल्वे स्थानकावर थांबणार

Hazrat Nizamuddin Vasco Da Gama Express: भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मागणीचा विचार करुन जेजुराचा थांबा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतेय.

Pramod Yadav

पुणे: दिल्ली ते गोवा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही अति जलद धावणारी रेल्वे आता पुण्यातील जेजुरी रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. याबाबत हालचाली सुरु झाल्या असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एक्सप्रेस जेजुरी स्थानकावर थांबण्याची मागणी केली जात होती, अखेर या मागणीला यश आले आहे.

जेजुरी रेल्वे स्थानकावरून अनेक जलदगती एक्सप्रेस धावतात दरम्यान, कोणतीच एक्सप्रेस स्थानकावर थांबत नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत भाविकांनी रेल्वे प्रशासनाकडे जेजुरी थांबा घेण्याची मागणी केली होती.

गेल्या काही दिवसांपासून याबाबत विचार सुरु होता. अखेर भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मागणीचा विचार करुन जेजुराचा थांबा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतेय. येत्या एप्रिलपासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

जेजुरी रेल्वे स्थानकापासून मंदिर दोन ते अडिच किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यान, स्थानकांवर रेल्वे थांबा घेत नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती. तसेच, खासगी वाहनाच्या मदतीने मंदिरापर्यंत जावे लागत असे. रेल्वेने थांबा घेतल्याचा त्याचा भाविकांना मोठा फायदा होणार आहे तसेच, अंतराची बचत होणार आहे. गोवा एक्सप्रेस जेजुरीला थांबल्यास या भागातील औद्योगिक क्षेत्राला देखील याचा मोठा लाभ होणार आहे.

जेजुरीला महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात. याशिवाय परराज्यातून कर्नाटक, आंध्र ,तेलंगणा ,राजस्थान, गुजरात येथून देखील भाविक जेजुरीला येत असतात. पण, रेल्वे थांबत नसल्याने भाविकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. यामुळे जेजुरीचा थांबा करावा, अशी मागणी भाविक आणि लोक प्रतिनिधी करत होते.

दरम्यान, या मागणीचा विचार करण्यात आला असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून दिल्ली ते गोवा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस जेजुरी रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे खंडोबाच्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT