महापालिका रुग्णालय  Danik Gomantak
महाराष्ट्र

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू

रुग्णालयात डॉक्टर सकाळी 9 संध्याकाळी 4 वाजेपर्यंत डॉक्टर उपलब्ध असतात याची कबुली दिली.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) प्रसूतीगृहामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉस्पिटल (Hospital)मध्ये रात्रीच्या वेळी डॉक्टर नसल्याने आठ महिन्याच्या गरोदर महिलेने तिचे प्राण गमावले. मुंबई (Mumbai)मधील मुलुंड भागातील पाच रस्ता परिसरातील पालिका प्रसूति गृहमधील ही धक्कादायक घटना आहे.

ही महिला मुलुंडच्या (Mulund)डंपिंग रोड परिसरात राहते. निशा कसबे या महिला आठ महिन्याच्या गरोदर होत्या. त्यांना पालिकेच्या रुग्णालयात सोमवार दुपारी दाखल केले होते. अचानक मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली.

रात्रीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये एकही डॉक्टर नव्हते. रात्री दोनच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांनी त्यांची तब्बेत बिघडल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकाना दिली.

त्या नंतर त्यांना पालिकेच्या सावरकर रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रसूतीगृहामध्ये (Maternity hospital) डॉक्टर नव्हते त्यामुळे त्यांच्यावर उपचार झाले नाहीत आणि यामुळे माता आणि निष्पाप जीवाचा दुर्दवी मृत्यू झाला.

याला पूर्णत: पालिका प्रशासन आणि डॉक्टर्स (Doctors)जबाबदार आहेत. असा नातेवाईकांनी आरोप केला आहे. तर याबाबत दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

या घटनेनंतर स्थानीक आमदार (MLA)कोटे यांनी रुग्णालयातील प्रशासनाला जाब विचारला, त्यांना सांगण्यात आले की, रुग्णालयात डॉक्टर सकाळी 9 संध्याकाळी 4 वाजेपर्यंत डॉक्टर उपलब्ध असतात याची कबुली दिली. आणि त्यानंतर या बाबत तक्रार पोलिसात करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT