Dalit Youth Killed in Latur Dainik Gomantak
महाराष्ट्र

Latur Crime News : पहिल्यांदा डोळ्यात मिरची पावडर टाकली, नंतर लोखंडी रॉडने मारहाण… व्याजाचा हप्ता चुकल्याने दलित तरुणाची हत्या

लातूर जिल्ह्यात एका ४८ वर्षीय दलित व्यक्तीची सावकाराने हत्या केली. हत्या झालेल्या व्यक्तीने सावकाराकडून व्याजाने 3000 हजार रुपये घेतले होते. याचे व्याज न दिल्याने सावकाराने हे क्रुकर्म केले.

Ashutosh Masgaunde

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात कर्ज फेडू न शकल्याने एका ४८ वर्षीय दलित व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रकरण लातूरच्या रेणापूर भागातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरीधर तबकाळे यांनी सावकार लक्ष्मण मार्कंड यांच्याकडून व्याजावर 3000 रुपये कर्ज घेतले होते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तो व्याजाचा हप्ता भरू शकला नाही.

या कारणावरून सावकाराने गिरीधरला २३ मे रोजी मारहाण केली. तसेच कर्ज फेडले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गिरीधर यांनी पोलिसांना माहिती दिली. परंतु पोलिसांनीही हे प्रकरण हलके घेत सावकारावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही.

गिरीधरने 23 मे रोजी झालेल्या भांडणाची माहिती स्थानिक पोलिसांना दिली होती, परंतु पोलिसांनी यात कोणताही गुन्हा नोंदवला नाही.

गिरीधर आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्याचे सावकाराला समजताच तो संतापला. त्याने गिरीधरला मारण्याची योजना आखली. त्यानंतर 2 जून रोजी तो अचानक त्याच्या एका नातेवाईक प्रशांतसोबत गिरीधरच्या घरी आला.

दोघांनी गिरीधरच्या डोळ्यात लाल तिखट घातलं. त्यानंतर दोघांनी मिळून त्याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर आणि पायावर लाथ मारू लागले. त्यानंतर त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. गिरीधर स्वत:चा बचाव करू शकला नाही आणि गंभीर जखमी झाला.

कुटुंबीयांनी गिरीधर तबकळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गिरीधरच्या हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर पोलिसांनीही या संपूर्ण प्रकरणाला घेरल्याचे दिसून येत आहे. गिरीधर 23 मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले होते, तर पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT