COVID-19 

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

सेलिब्रिटींसह राजकीय नेतेही सापडले कोरोनाच्या जाळ्यात

सुप्रिया सुळे यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: मुंबईत कोविड रुग्णसंख्या वाढत आहे. शहरातील कोरोना बाधितांमद्धे अनेक नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंब तसेच अभिनेता अर्जुन कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) यांना सप्टेंबर 2020 मध्ये देखील कोरोना झाला होता. "आम्ही कपूर यांचे निवासस्थान असलेल्या मजल्याला सील केले आहे आणि इमारतीच्या गेटवर एक सावधगिरीची सूचना चिकटवली आहे. आम्ही कोविड-19 (COVID-19) प्रोटोकॉलनुसार कारवाई करत आहोत,” असे सहाय्यक महापालिका आयुक्त पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सुप्रिया सुळे (Supriya Sule) व त्यांचे कुटुंब कोरोनाबाधित आहे. त्यांनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

"दोन मंत्री, पोलिस कर्मचारी व काही आमदारांसह सुमारे 50 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे," असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. वीकेंड ड्राइव्ह दरम्यान 2,300 हून अधिक चाचण्या करण्यात आल्या. सोमवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची चाचणी सकारात्मक आली; त्याच दिवशी भाजपचे आमदार समीर मेघे यांनाही कोरोनाची लागण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT