Corona's review presented by vijay wadettiwar at budget session of maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला कोरोनाचा आढावा

इतक्या कुटुंबांना मिळाली मदत

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या किती कुटुंबांना भरपाई मिळाली याची माहिती महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात दिली, आतापर्यंत दीड लाखांहून अधिक मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यास मंजुरी देण्यात आल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत एक लाख 54 हजार 500 लोकांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले. (Corona's review presented by vijay wadettiwar at budget session of maharashtra)

राज्य सरकारला (Maharashtra) मृतांच्या नातेवाईकांकडून 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी एकूण 2.44 लाख अर्ज प्राप्त झाले. वरिष्ठ आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली की राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या (SC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि तक्रार निवारण समित्यांनी स्वीकारलेले 1.63 लाख अर्ज मंजूर केले आहेत. "निधीसाठी 15,000 हून अधिक अपील मंजूर करण्यात आले आहेत

आणखी 15,000 अपील सुनावणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत असे ते म्हणाले, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आतापर्यंत 1.30 लाख अर्जदारांना 650 कोटी रुपये वितरित केले आहेत. "ही एक सातत्याने चालू राहणारी प्रक्रिया आहे, परंतु प्रकरणे आणि मृत्यूंची संख्या कमी झाल्याने पुढील महिन्यात अर्ज मंजूर होण्याची अपेक्षा आहे,असे अधिका-यांनी सांगितले. दरम्यान 60,000 हून अधिक अर्ज फेटाळण्यात आले असून 15,000 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT