Mumbai Municipal Corporation

 
Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईतील एकाच शाळेतील 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

आता शाळा प्रशासन संपूर्ण शाळेतील मुलांची कोरोना चाचणी घेत आहे

दैनिक गोमन्तक

नवी मुंबईतील एका शाळेत एकाच वेळी 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सर्व विद्यार्थी इयत्ता 8वी ते 11वी पर्यंतचे आहेत. आज शाळेत मोठ्या प्रमाणावर चाचणी घेतली जात आहे. शाळेतील सर्व 600 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. शाळेतील कोरोना संसर्गाचा कतारशी संबंध समोर आला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या (Municipal Corporation) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे वडील काही दिवसांपूर्वी कतारहून भारतात परतले होते.

हे प्रकरण नवी मुंबईतील घणसोली शाळेतील आहे. सर्व संक्रमित मुलांना स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर शाळा सुरू करण्यात आली. पन्नास टक्क्यांहून अधिक मुले शाळेत येत होती. दरम्यान, शुक्रवारी 16 मुलांमध्ये ताप, खोकला यासह कोरोनाची लक्षणे दिसून आली. तपासणीत 16 मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापन आणि मुलांच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबाची काळजीपूर्वक कोरोना (corona) चाचणी केली. या चाचणीत परदेशातून आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र त्याच्या मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर हा मुलगा ज्या शाळेत शिकला त्या शाळेच्या संपर्कात आलेल्या सर्व मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये 16 विद्यार्थी (student) कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता शाळा प्रशासन संपूर्ण शाळेतील मुलांची कोरोना चाचणी घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT