Maharashtra Weather Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात थंडीची लाट

Cold Wave in New Year: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारतात थंडीची लाट पसरली आहे.

दैनिक गोमन्तक

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारतात थंडीची लाट पसरली आहे. पुढचे आणखी काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाकडून दर्शविण्यात आला आहे. थंडीच्या तडाख्याने महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे.

उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे वर्षाचा पहिलाच दिवस गारेगार गेला. मुंबईतही (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून कमालीची थंडी पडली आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या मुंबईत राहुनच माथेरानचा फील येत आहे. सोमवारी मुंबईत 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर कुलाब्यामध्ये 18.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी मुंबईचे तापमान हे 15.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. माथेरानमध्येही 15 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये 11 ते 12 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

  • उत्तर भारतात थंडीची लाट

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर पश्चिम भारतातील (India) मोठ्या भागात थंडीची लाट पसरली आहे. येत्या तीन दिवसांत उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या वेगळ्या भागांमध्ये पुढील दोन दिवस थंडीची लाट पसरण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

  • तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वायव्य भारतातील मैदानी भागात हिमालयातून येणाऱ्या वायव्य वाऱ्यांमुळे येत्या दोन दिवसांत वायव्य आणि लगतच्या मध्य भारतातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. यामुळे मंगळवारपर्यंत राजस्थानच्या उत्तर भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात थंडीच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT