Aryan Khan  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Aryan Khan Case: आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये आर्यन आणि इतर पाच जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे, त्यांची नावे आरोपपत्रात नाहीत. त्याचाच अर्थ आर्यनला NCB ने क्लीन चिट दिली आहे.

दरम्यान, एसआयटीला आर्यनविरुद्ध (Aryan Khan) ठोस पुरावे मिळाले नाहीत. पुराव्याअभावी आरोपपत्रात ज्या लोकांची नावे समाविष्ट नाहीत, त्यात आर्यन खान व्यतिरिक्त अवीन साहू, गोपाल जी आनंद, समीर सैगन, भास्कर रोडा आणि मानव सिंघल यांचा समावेश आहे.

तसेच, आर्यनला एनसीबीने (NCB) 3 ऑक्टोबर रोजी एका क्रूझमधून अटक केली होती. मात्र, नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणात एनसीबीने आर्यन खानसह अन्य 19 जणांना आरोपी बनवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT