uddhav thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

'परप्रांतीयांच्या नोंदी ठेवा' मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला कडक आदेश

पोलीस महासंचालक (Director General of Police)कार्यालयात याबाबत गृहविभागाची आढावा बैठकीत झाली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी(CM) हे आदेश दिले.

दैनिक गोमन्तक

मुंबई: माणुसकीला लाजवणारी दुर्दैवी घटना साकीनाका(Sakinaka) येथे घडली. त्यात पिडीत महिलेचा मृत्यू झाला. यानंतर प्रकरणानंतर महाविकास आघाडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी तातडीने दखल घेतली आहे. येतुन पुढे परप्रांतीयांची नोंद ठेवा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 'राज्यात बाहेरुन कोण येतो? कुठून येतो? कुठे जातो?'काय करतो? या सर्व गोष्टींची नोंद ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. राज्यातील महिला अत्याचारांवर झालेल्या बैठकीत यायबाबत चर्चा झाली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी याची तातडीने दखल घेत असे आदेश दिले.

मुंबईतल्या साकीनाका या गंभीर घटनेची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली आहे. रविवारपासून सुरू असलेल्या उच्चस्तरीय बैठकांचे सत्र दुसऱ्या दिवशीही सुरू होते. महाराष्ट्रात बाहेरील राज्यातून कोण येतो? कुठून येतो, कुठे जातो,काय करतो या सर्व बाबींची नोंद ठेवा. असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिले. पोलीस महासंचालक कार्यालयात याबाबत गृहविभागाची आढावा बैठकीत झाली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले.

देशासह राज्याला लाजवणारी मुंबईतील साकिनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींने त्याच्या गुन्हा कबुल केला आहे. या प्रकरणी येत्या काही दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी महिती मुंबईचे पोलीस आयुक्त (Commissioner of Police)हेमंत नगराळे(Hemant Nagarale) यांनी दिली आहे. तसेच या आरोपीवर अँट्रॉसिटीचाही (Antrocity)गुन्हा दाखल केलेला आहे. आणि हे प्रकरण संवेदनशील असल्याने या प्रकरणी राजा ठाकरे (Raja Thackeray)यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली. राॅडने घुसवल्यामुळे आतड्यांना गंभीर मार लागला यामुळे पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. याआधी पीडित महिला आणि आरोपी 4 ते 5 वेळा भेटले होते. अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT