Chhatrapati Shivaji Maharaj On Rajkot Fort Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला

Malvan Sindhudurg: शिवरायांच्या पुतळ्याचे काम नुकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

Pramod Yadav

Chhatrapati Shivaji Maharaj On Rajkot Fort

सिंधुदुर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळला आहे. गेल्या वर्षी ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे उद्धाटन झाले होते. केवळ नऊ महिन्यातच शिवरायांचा पुतळा कोसळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत आहेत.

शिवसेनान उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. "महाराज माफ करा आम्हाला !! गद्दारांच्या हातून आपला झालेला अवमान आम्ही पाहू शकत नाही..." असे ट्विट राऊतांनी करत सरकारवर टीका केली आहे.

आमदार वैभव नाईकही आक्रमक

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि कुडाळचे आमदार वैभव नाईक देखील या घटनेवरुन आक्रमक झाले आहेत. शिवरायांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली. नाईक यांनी राजकोट किल्ल्यावर भेट देऊन पाहणी केली.

नौसेना दिनाचे औचित्य साधून 4 डिसेंबर 2023 रोजी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. याच पावसात पुतळा कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT