Solapur Barshi Dainik Gomantak
महाराष्ट्र

Solapur Barshi: नाशिकनंतर बार्शीत फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू

फटाके बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी येथे फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. यात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. फटाके बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. यावेळी तिथे 40 कर्मचारी काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पांगरी गावाजवळील फटाका फॅक्टरीत फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. यावेळी या फॅक्टरीमध्ये 40 हून अधिक कर्मचारी काम करत होते. 6 ते 7 कर्मचारी जखमी झाल्याची आणि दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे.

तसेच, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली.या भीषण स्फोटात आतापर्यत 12 जखमी रुग्णांना नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चार जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT