Laxman Jagtap
Laxman Jagtap Dainik Gomantak
महाराष्ट्र

Laxman Jagtap Passed Away: भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

गोमन्तक डिजिटल टीम

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर बाणेर येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. यशस्वी उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता मात्र, आज वयाच्या 59 व्या वर्षी जगताप त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचार सुरू असताना देखील जगताप यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या मतदतानासाठी हजेरी लावली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंंतर भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

(BJP MLA Laxman Jagtap of Chinchwad passed away)

खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लक्ष्मण जगताप यांचा प्रवास

लक्ष्मण जगताप पिंपरी चिंचवड महापालिकेत वीस वर्षे नगरसेवक होते, त्यांनी शहराच महापौरपद देखील भूषविले. 2004 साली ते विधानपरिषदेत आमदार म्हणून गेले. 2009 साली अस्तित्वात आलेल्या चिंचवड मतदारसंधातून जगताप अपक्ष म्हणून निवडणून आले. 2014, 2019 मध्ये ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले.

12 दिवसांत भाजपने गमावले 2 आमदार

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. त्याचबरोबर लक्ष्मण जगताप यांनासुद्धा अनेकवेळा खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT