jayant patil Dainik Gomantak
महाराष्ट्र

''भाजप बुजगावण्यांना पुढे करत देशाच्या ज्वलंत प्रश्नांवरुन लक्ष्य हटवते आहे''

उद्या अनुचित घडला तर पोलिस ठोस कारवाई करतील - जयंत पाटील

दैनिक गोमन्तक

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत पुन्हा भोंगा आणि हनुमान चीलीसा मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्य सरकारला सुनावलं होतं. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीचे नेते कडाडून टीका करत आहेत. तर राज ठाकरे ही याला प्रतिउत्तर देत आहेत. (BJP is targeting the burning issues of the country)

या सगळ्यात सामान्य जनतेचे प्रश्न दुर फेकले गेले असले तरी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप काही बुजवाण्यांना पुढे करुन देशातील ज्वलंत प्रश्नांवरुन लक्ष्य हटवण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेची नाराजी उफाळून येऊ नये यासाठी हे राजकीय भोंगे वाजवण्यात येत आहेत असे ते म्हणालेत.

राज ठाकरेंवर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरही ​​​​​राज ठाकरे यांची आक्रमक भूमिका कायम असल्याने जयंत पाटील यांनी त्यांना फटकारले आहे. या प्रकरणी त्यांनी राज यांचे नाव न घेता त्यांना बुजगावण्याची उमपा दिली आहे.

राज्यातील तरुणांचे करिअर खराब करण्याचे काम कोणीही करु नये. घोषणा देणारे, चिथावणी देणारे आपली कामे करत असतात. परंतू तरुण रस्त्यावर उतरुन आपले करिअर खराब करतात. त्यामुळे कोणीही अशा चिथावणीला बळी पडू नये असा सल्ला जयंत पाटील यांनी तरूणांना दिला आहे. दरम्यान बोलत असताना जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डेसिबलची मर्यादा न पाळणाऱ्या भोंग्यांवर कारवाई नियमाप्रमाणे केली जाईल असेही स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT