beed seven death on ambajogai latur road accident  Dainik Gomantak
महाराष्ट्र

अंबाजोगाईमध्ये भीषण अपघात, 7 जणांनी गमवला जीव

या अपघातात क्रुझर गाडीतील 5 महिला 1 बालक जागीच ठार तर...

दैनिक गोमन्तक

लातूर-अंबाजोगाई महामार्गावर नांदगाव फाट्याजवळ नंदगोपाल डेअरी नजीक शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास ट्रक आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला. ही धक्कादायक घटना अंबाजोगाई - लातूर महामार्गावर घडली. नंदगोपाल दूध डेअरीजवळ आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ट्रक -क्रुझरचा अपघात झाला. या अपघातात सात जण ठार तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अरुंद महामार्गामुळे बर्दापूर ते अंबासाखर टप्प्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत. (beed seven death on ambajogai latur road accident)

अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर अक्षरशः रक्तमांसाचा सडा पडला होता. या अपघातात क्रुझर गाडीतील 5 महिला 1 बालक जागीच ठार तर एका पुरुषाचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतकांची अद्याप नावे समजू शकली नाहीत अपघातातील जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझर जीपमधील सर्वजण आर्वी येथून सकाळीच्या सुमारास उत्तमराव गंगणे (रा.राडी) यांच्याकडे कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यावेळी अंबाजोगाई-लातूर हायवेवरील नंदगोपाल दूध डेअरी पायगावजवळ भरधाव वेगात असणाऱ्या ट्रक आणि क्रुझरची समोरासमोर धडक झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT