चंद्रकांत पाटील  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यांना जामीन मंजूर

Maharashtra: मात्र, त्यानंतरही काही संतप्त कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती.

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अनुदानाबद्दल बोलताना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर महापुरुषांनी भीक मागून शाळा सुरु केल्या अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. महापुरुषांबद्दल भीक हा शब्द वापरल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली. त्यानंतर त्यांनी दिलगिरीदेखील व्यक्त केली होती.

मात्र, त्यानंतरही काही संतप्त कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती. शाईफेक करण्याऱ्या चौघांना अटक करण्यात आली होती. त्यांची सुटका व्हावी यासाठी संघटनांकडून प्रयत्न केले जात होते. आता या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या मनोज घरबडेंसह इतर तीघांना आता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर लावण्यात आलेले कलम 307 रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर,11 पोलीसांचे निलंबनही मागे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यावर भाजप ( BJP )नेते चंद्रकांत पाटील यांची या जामीनावर काय प्रतिक्रिया असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT