ANNA MAHARAJ
ANNA MAHARAJ 
महाराष्ट्र

प.पु.सद्गुरू विनायक अण्णा राऊळ महाराज अनंतात विलीन

दैनिक गोमंतक

कुडाळ: सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प.पु.सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचे पुतणे तसेच मठाचे मठाधिपती प.पु.सद्गुरू विनायक अण्णा राऊळ महाराज  आज वयाच्या 76 व्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यांच्या निधनाने पिंगुळीसह महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातील देश विदेशातील लाखो भाविक शोकसागरात बुडाले आहेत सर्वसामान्याचे पालनहार अनेकांचे आधारवड दीनांचे कैवारी  अण्णा महाराज यांचे  निधन लाखो भाविकांना चटका लावून गेले आज त्यांना शोकाकुल वातावरणात  समाधी देण्यात आली.

पिंगुळी गांवचे भूषण प.पु.राऊळ महाराज संतनगरीचे सर्वेसर्वा अण्णा महाराज गेले काही दिवस आजारी होते. त्यांना पडवे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज मध्यरात्री त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाची वार्ता सर्वत्र समजताच केवळ सिंधुदुर्ग जिल्हा नव्हेतर महाराष्ट्र  गोवा  कर्नाटक राज्यातील भाविक शोकसागरात बुडाला. काही भाविक आज मध्यरात्री पहाटे पिंगुळी संतनगरीत दाखल झाले अण्णा महाराज यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून सर्व भक्त गेले काही दिवस 24 तास अण्णांच्या तब्बेतीत सुधारणा होऊन आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी असे साकडे घालत होते अखेर आज मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालविली. 

अनेकांचे आधारवड असणाऱ्या अण्णा महाराज यांनी आपल्या 76 वर्षाच्या कारकिर्दीत सर्वांची मी एक गुराखी ,मी एक झाडूवाला म्हणूनच भाविकांची सेवा केली. प.पु.राऊळ महाराज यांनी त्यांच्याकडे दिलेली सर्व जबाबदारी त्यांनी गुरू शिष्य या भावनेतून जोपासून या पिगुळी संत नगरीचे नंदनवन केले. मठामध्ये होणारे विविध धार्मिक आरोग्य  सांस्कृतिक कार्यक्रम लक्षात घेता या ठिकाणी येणारे लाखो संख्येने भाविक त्यांचे परिपूर्ण नेटनेटके नियोजन हे अण्णा महाराजाचे होते. या ठिकाणी शिस्त व नियोजन या गोष्टी अण्णा महाराजांकडे अग्रक्रमाने होत्या अण्णा महाराजांचा 75 वा अमृतमहोत्सवी सोहळा 13 मार्च 2019 ते 14 मार्च 2020 या कालावधीत वर्षभर सिंधुदुर्गसह महाराष्ट्र व गोवा राज्यात विविध सामाजिक आरोग्य क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रमांनी दिमाखात साजरा करण्यात आला.

या वर्षभरात हजारो गरजूंना मोठया प्रमाणात आर्थिक तसेच वस्तूस्वरुपात मदत करण्यात आली होती मदतीचा ओघ त्यांनी कित्येक वर्षे जोपासला जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरही त्यांनी विविध संस्था देवालये शैक्षणिक वास्तू यासाठी मोठया प्रमाणात मदत केली आहे नुकताच 13 मार्च 2021 ला त्यांनी आपला 76 वा वाढदिवस कोरोना महामारी संकट कालावधीत नियमांच्या अधीन राहून साध्या पध्दतीने साजरा केला होता. यावेळीसुद्धा त्यांनी गरजूंना मदत देण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले पिंगुळी संतनगरीचे सरपंच म्हणूनही काम केले. पिंगुळी गावाला स्वच्छता अभियानमध्ये राज्यपातळीवर अव्वल स्थानी नेण्यास त्यांचे योगदान आहे त्यावेळी त्यांनी गावामध्ये उल्लेखनीय स्वच्छता मोहीम राबविली होती. कोरोना संकटात अनेकांना मदतीचे हात देतानाच त्यांनी संपूर्ण गांव निर्जंतुकीकरण केले होते. प.पु.सद्गुरु राऊळ महाराज ट्रस्ट व प.पु.विनायक अण्णा राऊळ महाराज ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक आपत्कालीनसाठी महाराष्ट्रच नव्हे तर केरळ राज्यालासुध्दा आर्थिक मदत केली होती. ते आध्यात्मिक होते चांगले लेखक होते बांधकाम क्षेत्रात त्यांचा अभ्यास होता नेतृत्व दातृत्व कर्तृत्व या गुणांनी हे सुपरिचित होते. 

आज समाधीस्थ करण्यात आले
अण्णा महाराज यांनी आपली अगोदरच समाधी करून ठेवली होती त्यांच्या भक्तांनी विधी करून आज त्यांना कुटूंब व भाविक यांच्या मोजक्याच उपस्थितीत समाधीस्थ केले साश्रू नयनांनी अण्णा महाराजांना निरोप देण्यात आला.

तर जनसागर लोटला असता ....
अण्णा महाराज यांच्या निधनाची बातमी आज मध्यरात्रीच सर्वत्र पसरली प्रत्येक भक्त गुरूंच्या दर्शनासाठी आतुर झाला होता परंतु कोरोना संकटामुळे तुम्ही आहे त्या ठिकाणी राहून अण्णांना निरोप द्या असे सांगण्यात आले कोरोना संकट नसते तर आज पिंगुळी संतनगरीत भाविकांचा दुःखाचा जनसागर लोटला असता सर्व भक्त पोरके झाले हो अण्णा...
पोरके झालो आम्ही..
पोरकी झाली पिंगुळीतील लेकरे..
किती रडली असतील ती लेकरे,
किती रडली असेल ती पावन भुमी,
दु:ख या शब्दाची सुध्दा जाणीव होत नाहीये. काहीच जाणवत नाहीये. सगळं विश्व जणु स्तब्ध झालं आहे...बधीर झालं आहे.सद्गुरू अण्णा, तुम्ही आम्हाला फसवून...आणि जीवाला चटका लावून गेलात. आयुष्यातली कधीही भरून न येणारी पोकळी अशा प्रकारचे मन हेलावून टाकणाऱ्या भाविकांच्या प्रतिक्रिया अण्णांच्या प्रती असणाऱ्या अनेक गोष्टी आठवणी सांगून जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Green Chilli Price Today : पणजी बाजारात गावठी मिरचीला मोठी मागणी

Loksabha Election : दक्षिण गोव्‍यातील ख्रिस्‍ती मतेही भाजपलाच; दामू नाईक, उल्‍हास तुयेकर यांचा दावा

CBSE Latest Update: सीबीएसई रिझल्टपूर्वी मोठी बातमी! बोर्डाने जारी केला ॲक्सेस कोड; जाणून घ्या

Panaji News : ‘तनिष्का पुरुमेंत फेस्त’ला प्रतिसाद; खवय्यांना पर्वणी

Lemon Rate In Goa : तप्त उन्हात लिंबू खातोय भाव; दरात वाढ

SCROLL FOR NEXT