Loksabha Election : दक्षिण गोव्‍यातील ख्रिस्‍ती मतेही भाजपलाच; दामू नाईक, उल्‍हास तुयेकर यांचा दावा

Loksabha Election : सासष्टीतील आठपैकी चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. त्‍याचा निश्‍चितच फायदा या निवडणुकीत आम्‍हाला होणार.
bjp
bjp Dainik Gomantak

Loksabha Election :

मडगाव, केंद्रात पंतधान नरेंद्र माेदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने जी कामे केली आहेत, तसेच गोव्‍यात मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍याची जी प्रगती झाली आहे, ती पाहून दक्षिण गोव्‍यातील ख्रिस्‍ती मतदारही भाजपच्‍या बाजूने मोठ्या संख्‍येने मतदान करणार, असा दावा नावेलीचे आमदार उल्‍हास तुयेकर आणि फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनी केला.

‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात या दोन्‍ही भाजप नेत्‍यांच्‍या वेगवेगळ्‍या मुलाखती घेतल्‍या असता, या दोन्‍ही नेत्‍यांची या मुद्‍द्यावर एकवाक्‍यता दिसून आली.

bjp
Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

एकेकाळी सासष्टी हा काँग्रेसधार्जिणा तालुका म्‍हटले जायचे. मात्र, आता त्‍यात बदल झालेला आहे. सासष्टीतील आठपैकी चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. त्‍याचा निश्‍चितच फायदा या निवडणुकीत आम्‍हाला होणार. मडगाव, फातोर्डा या दोन मतदासंघात भाजपला आघाडी निश्‍चित आहे. नावेली मतदारसंघातही आम्‍ही आघाडी घेऊ ,असा आम्‍हाला विश्‍वास आहे,

- उल्‍हास तुयेकर, आमदार, नावेली

भाजप हा कार्यकर्त्‍यांचा पक्ष आहे. आमचा प्रत्‍येक कार्यकर्ता मतदारांशी जोडलेला आहे. आतापर्यंत दक्षिण गोव्‍यात सगळीकडे आमच्‍या प्रचाराच्‍या तीन फेऱ्या पूर्ण झालेल्‍या आहेत त्‍याचा आम्‍हाला निश्‍चितच फायदा होईल. मडगाव आणि फातोर्डा या दोन्‍ही मतदारसंघात भाजपाला आघाडी निश्‍चित आहे,

- दामू नाईक, माजी आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com