Anil Deshmukh  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Anil Deshmukh: 1 वर्ष 1 महिना 27 दिवसानंतर अनिल देशमुख कारागृहाबाहेर

Anil Deshmukh: आर्थर कारागृहातून त्यांची सुटका झाली आहे. मोठ्या जल्लोषात कार्यकर्ते त्यांचे स्वागत करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Anil Deshmukh: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे 1 वर्ष 1 महिना 27 दिवसानंतर कारागृहाबाहेर आले आहेत. आर्थर कारागृहातून त्यांची सुटका झाली आहे. कार्यकर्ते त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करत आहेत.

बाहेर पडल्यानंतर अनिल देशमुखांनी मला खोट्या आरोपाखाली आत टाकलं या शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे असंही त्यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळेंनी अनिल देशमुखांच्या सुटकेचे स्वागत तर केलेच आहे. त्याबरोबरच, ईडीने 109 वेळा रेड टाकल्याप्रकरणी ताशेरेही ओढले आहेत . ईडीने हा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या शब्दात ईडी तसेच विरोधकांवर टीका केली आहे.

अनिल देशमुखांचे कुटुंबही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे. देशमुख साहेबांना किती त्रास झाला आहे हे फक्त देवालाच माहिती आहे, आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी अजित पवार ( Ajit Pawar ), सुप्रिया सुळे , छगन भुजबळ त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले आहेत.

दरम्यान, अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी  सीबीआय ( CBI )आणि त्यानंतर ईडी ( ED ) च्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचा आरोपही करण्यात आला होता.

मागच्या बऱ्याच दिवसांपासून जामीन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होता मात्र सीबीआयने उच्च न्यायालयात जामिनावर स्थगिती आणण्यासाठी धाव घेतली होती.मात्र उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका काल फेटाळून लावली होती. अखेर आज आर्थर कारागृहातून अनिल देशमुखांची सुटका झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT