Deputy Chief Minister Ajit Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

25 हजार कोटींचा घोटाळा हा खोटा आरोप, अजित पवारांचं प्रत्युत्तर

'आज मी सर्व कागदपत्रे घेऊन आलो आहे, सगळ्या कागदपत्रांचा खुलासाही यावेळी करणार', असेही त्यांनी यावेळी म्हटले.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण मागील काही दिवसांपासून गाजत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना विरोधकांवर फैरी झाडल्या. तसेच साखर कारखान्यांबद्दलही त्यांनी यावेळी मोठा खुलासा केला. तसेच त्यांनी म्हटले की, 'आज मी सर्व कागदपत्रे घेऊन आलो आहे, सगळ्या कागदपत्रांचा खुलासाही यावेळी करणार', असेही त्यांनी यावेळी म्हटले.

पवार म्हणाले, मागील काही दिवसांपासून मला सांगायचं होत की, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या बाबतीत बातम्या आल्या त्यामधून माझ्यावर बरेच आरोप करण्यात आले. मात्र यासंबंधीची सत्यता सर्वांना समजली पाहिजे त्यासाठी मी तुमच्या समोर सर्व कागदपत्रांचा खुलासा करत आहे. बऱ्याच चौकशांच्या फेऱ्या झाल्या मात्र त्यामधून काही निषन्न झाले नाही. तसेच साखर कारखान्यांबद्दल खोटी कागदपत्रे सादर करुन माझ्यावर नाहक आरोप राज्यातील विरोधकांनी केले आहेत. 25 हजार कोटींचा घोटाळा हा खोटा आरोप आहे. मात्र मागील सरकारच्या काळात चौकशी करुनही त्यांना काही मिळाले नाही. सहा कारखाने जिल्हा बॅंकेने कारखाने विकले. तसेच 30 कारखाने राज्य सहकारी बॅंकेने विकले. राज्यातील ६५ कारखाने काही चालवायला दिले तर काही विकले. दुसरीकडे 11 कारखाने 25 वर्षांच्या करारावर चालवायला द्यायचे आहेत. मात्र काही राजकीय विरोधक लोकांची फसवणूक करण्याचे प्रयत्न करत आहे. जरंडेश्वर कारखाना हनुमंत गायकवाड यांनी चालवायला घेतला होता. मात्र जंरडेश्वर कारखान्यांच्या बाबतीत माझ्या नातेवाईकांची नावे सतत विरोधकांकडून घेतली जात आहे. त्याचबरोबर कारखान्याला बॅकेचे कर्ज द्या आणि नंतर तुम्ही चालवायला घ्या असेही न्यायालयात सांगण्यात आले होते. ज्या लोकांमुळे कारखान्यांचे नुकसान झाले तेच आमच्यावर आरोप करत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार जंरडेश्वर कारखान्याचा व्यवहार झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT