Shahrukh Khan Dainik Gomantak
महाराष्ट्र

लाज वाटली पाहिजे म्हणत; शाहरुखच्या समर्थनार्थ राऊतांनी दिलं ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर

दीदींना श्रद्धांजली वाहताना शाहरुख खानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यानंतर शाहरुख खानला विनाकारण ट्रोल करण्यात आले

दैनिक गोमन्तक

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर बॉलीवूड क्षेत्रातील सर्व कलाकरांना दु:ख झाले आहे. अशा परिस्थितीत, लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी (Lata Mangeshkar Last Ride) काल मुंबईमध्ये मोठी गर्दी जमली होती , ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार सेलिब्रेचीही उपस्थित होते. सुपरस्टार शाहरुख खानही (Shahrukh Khan) लता मंगेशकर यांना निरोप देण्यासाठी काल शिवाजी पार्क येथे पोहोचला होता दीदींना श्रद्धांजली वाहताना शाहरुख खानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यानंतर शाहरुख खानला विनाकारण ट्रोल करण्यात आले. मात्र आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शाहरुख खानच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत .

का झाला शाहरुख खान ट्रोल?

शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीसह लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर पोहोचला होता. यावेळी शाहरुखने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट सनग्लासेस घातले होता. शाहरुख खान जेव्हा लता मंगेशकर यांच्या पार्थिवाच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याने इस्लामिक रितीरिवाजांनुसार हात वर केले आणि दीदींसाठी पार्थना केली आणि नंतर त्यांच्या पायाचे चुंबन घेतले. नंतर शाहरुखने इस्लामिक रितीरिवाजांनुसार फूंक मारली. यानंतर सोशल मीडियावर शाहरुखबद्दल विचित्र गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या आणि त्याला ट्रोल केले जाऊ लागले.

काय म्हणाले संजय राऊत?

शाहरुखने लता मंगेशकर यांच्या पायावर थुंकल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जाऊ लागल्या. यानंतर शाहरुख खानच्या विरोधात वक्तृत्वाची मालिका सुरूच राहिली. अशा स्थितीत शाहरुखचे समर्थकही पुढे आले आणि स्पष्टीकरण देऊ लागले. त्याचवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शाहरुख खानच्या समर्थनार्थ येऊन ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, संजय राऊत यांनी शाहरुख खानला विनाकारण ट्रोल करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, जी त्यांच्याकडे अजिबात नाही. अशा दु:खद प्रसंगी एका अभिनेत्याला ट्रोल केले जात आहे. 'लताजी एक महान आत्मा होत्या त्यांच्या शरीरातून त्यांचा आत्मा मुक्त झाला होता.पण त्या आपल्यातच आहेत. लताजी राजकारणी नव्हत्या की त्यांच स्मारक बांधावं त्या अशात अदृश्य रूपाने आपल्यात राहणार आहेत,' असे राऊत या सर्व प्रकारानंतर बोलत होते.

लता मंगेशकर यांच्यावर कोरोनामुळे बराच काळ रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. लता मंगेशकर यांनी काल रविवारी सकाळी 8.12 वाजता अखेरचा श्वास घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

Rajpal Yadav: विमानतळाप्रमाणे जेलमध्येही हवा 'स्मोकिंग झोन', तिहार तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची अजब मागणी; काय म्हणाला नेमका?

Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

Poonam Pandey: पूनम पांडेच्या निशाण्यावर बडे क्रिकेटर्स? 'मेसेज' करून काय मागतात? स्वतःच केला खुलासा

Taliban New Penal Code: बायकोला हाडं तुटेपर्यंत मारणं आता 'कायदेशीर', तालिबानचा नवा क्रूर कायदा; अफगाणिस्तानात पुन्हा महिलांच्या हक्कांची पायमल्ली

SCROLL FOR NEXT