bats in Maharashtra
bats in Maharashtra 
महाराष्ट्र

Nipah Virus: महाराष्ट्राच्या या भागात आढळला विषाणू, नेमकं काय आहे हा निपाह व्हायरस

गोमन्तक वृत्तसेवा

पुणे: देशात कोरोना व्हायरसचा(Covid-19) प्रसार मोठ्या प्रमाणात होत असतांनाच आता देशात नवीन सकंट येण्याची शक्यता दिसत आहे. खरंतर 2018 मध्ये केरळ राज्यात या विषाणूने थैमान घातले होते  त्यावेळी केरळमध्ये(Kerala) मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू झाले होते. त्या जिवघेण्या विषाणूचे नाव निपाह (Nipah) आहे. जो आता महाराष्ट्रात देखिल आढळून आला आहे. (After COVID 19 Nipah Virus found in this part of Maharashtra)

महाराष्ट्रातील दोन वटवाघुळांमध्ये विपाह विषाणू आढळून आल्याचे समोर येत आहे. कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र बाहेर येत असतानाच महाराष्ट्राला आता निपाह विषाणूचा धोका निर्माण होण्याची संभवताना दिसत आहे. जिवघेणा निपाह विषाणू महाराष्ट्रातील दोन वटवाघुळात आढळून आला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांना महाबळेश्ववरातील गुहेत दोन वटवाघुळात निपाह विषाणू आढळला आहे.  महाराष्ट्रातील कोणत्याही वटवाघुळामध्ये यापूर्वी निपाहचा विषाणू आढळला नव्हता. मात्र, मार्च 2020 मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळला होता. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो, असे अभ्यासातील प्रमुख डॉ. प्रग्या यादव यांनी सांगितले.

निपाह हा विषाणू कोरोना विषाणूपेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. निपाह विषाणूमुळे केरळ राज्यात 2018 साली झालेल्या मृत्यूतांडवाचा विचार केला असता, हा विषाणू किती धोकादायक आहे याचा अंदाज येईल. कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये 1 ते 2 टक्के लोकांचा मृत्यू होतो. कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे. परंतु निपाहची लागण झालेल्या रुग्णांमध्ये 65 टक्क्याहून जास्त प्रमाणात मृत्यूदर असल्याचे काही देशातून समोर आले आहे. कोरोनापेक्षाही जास्त मृत्यूदर निपाह विषाणूचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT