Abdul Sattar 

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्या तर शिवसैनिकांना आनंद होईल

अब्दुल सत्तार म्हणाले की, "रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद द्यावं जर असं झालं आणि शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उध्दव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तर सर्वच शिवसैनिकांना आनंद होईल.

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रीया झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते मंत्रालयात उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री बदलल्याच्या चर्चा विरोधक आणि राजकीय वर्तुळात होत आहेत. यातच आता शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलेल्या वक्तव्यामळे त्याला आणखीनच खतपाणी मिळाले आहे. "रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार म्हणालेकी, "रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद द्यावं अशी चर्चा होत आहे. जर असं झालं आणि शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उध्दव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तर सर्वच शिवसैनिकांना आनंद होईल. रश्मी ताई सामना पेपर चांगला चालवत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून सामनाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. ही जबाबदारी त्या चोखपणे पार पाडत आहेत. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आणि रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्या तर महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील. त्यामुळे माझ्यासह सर्वच शिवसैनिकांना आनंद होईल असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचे नाव

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (Chandrakant Patil) पाटील यांनीही या आधी मुख्यमंत्री बदलावरून वक्तव्य केलं होतं. "मुख्यमंत्र्याची तब्येत ठिक नसेल तर त्यांनी दुसऱ्या कोणाकडे तरी चार्ज द्यावा. त्यांचा इतर कोणावर विश्वास नसेल तर पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे चार्ज द्यावा" असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT