sexually abusing children Dainik Gomantak
महाराष्ट्र

वडापाव पडला महागात! घाटकोपर परिसरात 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

यापूर्वी तब्बल 5 वेळा आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; मुंबईत एका 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या 7 वर्षीय मुलीवर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अरोपीला पोलिसांनी 24 तासांत अटक केली आहे. मुंबई पोलिस झोन 7 चे डीसीपी प्रशांत कदम यांनी सांगितले की, मुलगी वडापाव आणण्यासाठी जवळच्या दुकानात गेली होती, तेव्हा आरोपीने मुलीला फूस लावून दूरच्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पळून गेला.

(7 year old girl sexually abused in Ghatkopar area)

ही बाब उघडकीस आल्यानंतर झोन 7 चे डीसीपी प्रशांत कदम यांनी 8 टीम तयार करून 24 तासांत आरोपीला अटक केली. सचिन अनंत शमा असे अटक आरोपीचे नाव असून त्याचे वय 35 वर्षे असून तो टेम्पो चालक आहे. आरोपीवर यापूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल असून, त्याच्यावर एकूण 5 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या घाटकोपर पोलीस आरोपीला अटक करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी एका किशोरीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पश्चिम बंगालमधील एका 27 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हिल लाइन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण यांनी सांगितले की, उल्हासनगर बस्तीमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या आरोपीने 16 वर्षीय मुलीचे घराजवळून अपहरण केले आणि तिला पश्चिम बंगालमधील त्याच्या मूळ गावी नेले, यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT