Maharashtra Gondia train accident AN
महाराष्ट्र

Train Accident: गोंदियामध्ये मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, 50 हून अधिक प्रवाशी जखमी

या अपघातात 50 जण जखमी झाले आहेत. यातील 13 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Gondia train accident: महाराष्ट्रातील गोंदियामध्ये आज एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. गोंदियाजवळ 'भगत की कोठी' या मालगाडीला धडक बसली, त्यानंतर ट्रेनची एक बोगी रुळावरून घसरली. या अपघातात 50 जण जखमी झाले आहेत. यातील 13 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही गाडी रायपूरहून नागपूरच्या दिशेने येत होती. त्यानंतर गोंदिया शहराजवळ भगत की कोठी गाडी मालगाडीला धडकली. यामध्ये रेल्वेचा एस 3 डबा रुळावरून घसरला. यामध्ये 13 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात रात्री उशिरा अडीचच्या सुमारास घडला. मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेन भगत की कोठी दरम्यान सिग्नल न मिळाल्याने हा अपघात झाला. यात सुदैवाने एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. अपघाताला बळी पडलेली ट्रेन छत्तीसगडमधील बिलासपूरहून राजस्थानमधील जोधपूरला जात होती.

मागून ट्रेनची धडक

जखमी प्रवाशांना गोंदिया जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री ही घटना घडली. या दोन्ही गाड्या एकाच दिशेने म्हणजेच नागपूरच्या दिशेने जात होत्या. हिरवा सिग्नल मिळताच भगत ची कोठी ही गाडी पुढे निघाली. मात्र गोंदिया शहरापूर्वी मालगाडीला सिग्नल न मिळाल्याने ती रुळावर उभी होती. त्यामुळे भगत ची कोठी गाडीने मालगाडीला मागून धडक दिली आणि हा अपघात झाला.

भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार , पहाटे 4.30 वाजता री-रेल्मेंटचे काम पूर्ण झाल्यानंतर, बाधित ट्रेन सकाळी 5.24 वाजता घटनास्थळावरून निघाली आणि 5.44 वाजता गोंदियाला पोहोचली. त्याचवेळी सकाळी 5.45 वाजता अप आणि डाऊन वाहतूक पूर्ववत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

MI vs DC: षटकारांच्या दुनियेत रोहित शर्माचा एकतर्फी दरारा! विराट-धोनीच्या 'एलिट' क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री; दिल्लीत रचला इतिहास

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

SCROLL FOR NEXT