Borivali Building Collapsed  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: बोरिवलीत 4 मजली इमारत जमिनदोस्त, बचावकार्य सुरु- VIDEO

मुंबई-बोरीवलीत 4 मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

Borivali Building Collapsed : मुंबई-बोरीवलीत 4 मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. बोरीवलीतल्या साईबाबा नगरमधील गितांजली येथे ही दुर्घटना घडली आहे. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे तर काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. (4 storey building collapses in Borivali 12 to 15 people are feared to be trapped)

दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी इमारत कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. अग्निशमन दलाला लेव्हल 2 चा कॉल मिळाला होता तर बोरिवलीतील साईबाबा नगरमधील गितांजली नावाची ही इमारत आहे. तळमजला आणि तीन मजले अशी ही इमारत होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत तर इमारत जखमी झाल्याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कोसळलेली गितांजली इमारत पालिकेकडून धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती तर पालिकेकडून इमारतीतील सर्वांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यापैकी एक पंजाबी कुटुंब इमारत कोसळली तेव्हा इमारतीमध्ये उपस्थित होतं. याच कुटुंबातील 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

इमारत कोसळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. पत्त्यासारखी ही इमारत अगदी क्षणार्धात जमिनदोस्त झाली तर सध्या बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली एका कुटुंबातील 5 ते 6 जण अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे आणि त्यासोबतच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT