गोव्याच्या जनतेच्या वतीने, मी अशोक गजपती राजू यांचे आमच्या सुंदर राज्याचे राज्यपाल म्हणून हार्दिक स्वागत करतो. प्रशासकीय आणि संसदीय अनुभव असलेले एक अनुभवी राजकारणी, विकसित गोवा २०३७ च्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवताना त्यांचे मार्गदर्शन अमूल्य ठरेल. प्रत्येक गोव्याच्या विकास आणि कल्याणासाठी राज्यपाल राजू यांच्यासोबत जवळून काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
होंडा पंचायतीत अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दोन दिव्यांग लाभार्थ्यांना ही वाहने वितरित. दिव्यांग व्यक्तींना समाजात स्वाभिमानाने आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी तीनचाकी स्कूटरचे वाटप. आमदार डॉ. दिविया राणे यांचे प्रतिपादन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुष्पती अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या जागी; राजू माजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री होते.
बेतकी खांडोळा पंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीत गोविंद गावडेंची बाजी. अविश्वास ठरावाच्या नाट्यमय घडामोडीत पुन्हा विशांत नाईकच सरपंचपदी विराजमान, तर संजीवनी तळेकर पुन्हा उपसरपंच. 5 पैकी आमच्यासोबत असलेली एक महिला पंच फुटल्याने सरपंच आणि उपसरपंच पदासाठी केलेली दावेदारी मागे घेतल्याची पंच दिलीप नाईक यांची माहिती.
दिव्यांग व्यक्तींना समाजात स्वाभिमानाने, स्वावलंबीपणे आणि स्वतंत्रपणे जगता यावे, यासाठी तीनचाकी स्कूटरचे वितरण करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. दिविया राणे यांनी केले. होंडा पंचायतीत अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभागाच्या वतीने दोन दिव्यांग व्यक्तींना वाहन प्रदान.
चोडण-राबंदर मार्गावर गंगोत्री आणि द्वारका या दोन आधुनिक रो-रो फेरी अधिकृतपणे सुरू झाल्या. या नवीन फेरी प्रवाशांसाठी जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायी नदी वाहतूक प्रदान करतील अशी अपेक्षा आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पामुळे होंडा पंचायतीला येणार झिरो बिल आमदार डॉ दिव्या राणे. होंडा पंचायतीत सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी मंगळवारी बोलावलेल्या विरोधी आमदारांच्या बैठकीला उपस्थिती लावण्याबाबत गोवा फॉरवर्ड पक्षा पाठोपाठ आम आदमी पक्षाचीही अनिश्चितता. ह्या आणि गोव्यातील काँग्रेसच्या कारभाराबाबत मात्र गोवा काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे अनभिज्ञ. आपण ह्या सगळ्याची माहिती जाणून घेणार, ठाकरेंची गोमन्तक टीव्हीशी बोलताना प्रतिक्रिया.
मानसवाडा- कुंडई येथे प्रवासी घेण्यासाठी थांबलेल्या बसला ट्रकची धडक. स्कुटर चालकाने उडी घेतल्याने बचावला. म्हार्दोळ पोलिसांनी केला पंचनामा
विठ्ठलनामाचा जयघोष आणि शेकडो विठ्ठलभक्त वारकऱ्यांच्या साक्षीत मुळगाव येथे 'गंगापूजन' सोहळा उत्साहात. श्री केळबाई सातेरी वारकरी संस्थेतर्फे आयोजन. पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीर्थाचे पूजन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.