मनोज परब यांचा पक्ष रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षानं खातं उघडलं असून, सांताक्रूझमधून इस्पेरांका ब्रागांझा विजयी झाले आहेत.
हरमल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राधिका पालेकर 56 मतांनी विजयी झाल्या.
भाजपचे महेश्वर गोवेकर यांनी शिवोली जिल्हा पंचायत जागा जिंकली. १७१४ मताधिक्य त्यांनी मिळवले.
उसगाव गांजे जागेवर भाजप उमेदवार समीक्षा नाईक ६,२९० मतांनी विजयी झाल्या आहेत.
लाटंबार्सेत कमळ फुलले. अटीतटीच्या लढतीत भाजपचे विजयी उमेदवार पद्माकर मळीक हे 980 मतांची आघाडी मिळवून विजयी
होंडामध्ये भाजप उमेदवार नामदेव च्यारी ९,८१६ मतांनी विजयी झाले आहेत. इथं आरजीच्या उमेदवाराला १,१०७ मते मिळाली असून, काँग्रेस उमेदवार ८२८ मतांपर्यंत मजल मारु शकला.
सांताक्रूझ काँग्रेसची उमेदवार शायनी ओलिव्हरा २,६१४ मतांनी आघाडीवर आहे, त्यानंतर भाजपची सोनिया नाईक १,६९६ मतांसह दुसऱ्या, तर आरजीपी इस्प्रेन्सा ब्रागांसा १, ५४६ मतांसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसने या मतदारसंघात ९१८ मतांची आघाडी घेतली आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, भाजपला मोठा धक्का बसला आहे. दवर्लीत काँग्रेस उमेदवार फ्लोरियानो फर्नांडिस ४६१ मतांनी विजयी झाले आहेत. भाजप आमदार उल्हास तुयेकरांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
कळंगुट जिल्हा पंचायत जागेवर काँग्रेसचा उमेदवार ५४२ आघाडीवर असून, भाजप उमेवार पिछाडीवर पडला आहे. काँग्रेस उमेदवार आघाडीवर असल्याने हा लोबोंसाठी काहीसा चिंतेचा विषय ठरत आहे.
कवळे जिल्हा पंचायत मतदारसंघात पहिल्या फेरीनंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा उमेदवार ३५५८ मतांसह आघाडीवर आहे. तर आरजीपीच्या उमेदवाराला १,१२९ मते मिळाली आहे
लाटंबार्से मतदारसंघ मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण. पोस्टल मते धरून भाजप उमेदवाराला 497 मतांची आघाडी. दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु.
सत्तरी तालुक्यातून पहिला कल हाती आला आहे. होंडा जिल्हा पंचायतीत भाजप उमेदवार नामदेव चारी आघाडीवर आहेत. तर, काँग्रेस पिछाडीवर आहेत.
जिल्हा पंचायत निवडणूक ही भाजपसह इतर पक्षांसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट ठरणार आहे. या निवडणुकीच्या निकालावर भविष्यातील अनेक समीकरणं ठरणार आहेत.
गोवा जिल्हा पंचायतीसाठी शनिवारी (२० डिसेंबर) मतदान पार पडले. यानंतर आज पंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी आज (२२ डिसेंबर) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सत्तरी, डिचोलीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा मिळून ५० मतदारसंघात २२६ उमेदवार रिंगणात आहेत. यास १५ ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीसाठी ६०० कर्मचारी तर १,२०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.