मडगाव शहर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत यंदा केवळ एकच डेंग्यूचा रुग्ण सापडल्याची माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. बाप्तिस्त मास्कारेन्हस यांनी दिली. गेल्या वर्षापेक्षा यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या कमी आहे. डेंग्यूची लक्षणे असलेले जवळजवळ आठ रुग्ण निरीक्षणाखाली आहेत, असेही त्यांनी सांगितले. यंदा मलेरिया रुग्णांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच काळात मलेरियाचे ८३ रुग्ण सापडले होते.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी कार्यरत असलेली संसदीय समिती ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी गोवा दौऱ्यावर येत आहे. दोन दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यादरम्यान समिती राज्यातील विविध मंत्रालये, विभाग, सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था आणि इतर सरकारी आस्थापनांमध्ये अनुसूचित जाती-जमातींचे प्रतिनिधित्व कितपत आहे, याचा आढावा घेणार आहे.
तांबेटी - मायणा येथून बुलेट चोरीप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी प्रिन्स फर्नांडिस (वय ३६) आणि मायरन फर्नांडिस या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या पाच दुचाक्या जप्त केल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३०३ (२) कलमाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनंत गावकर पुढील तपास करीत आहेत.
पॅशन प्रो हिरो होंडा मोटरसायकल (जीए-१०-बी- ३२९२) चावडी येथील कदंब बसस्थानकावरून चोरीला गेल्याची तक्रार वेलवाडा-पैंगीण येथील निवृत्त शिक्षक लक्ष्मण प्रभुगावकर यांनी आज सोमवारी काणकोण पोलिसांत दाखल केली. तक्रारीनुसार, त्यांनी सकाळी ९ वाजता चावडी-काणकोण कदंब बसस्थानकाजवळ मोटारसायकल उभी केली आणि काही कामासाठी पणजीला निघाले. संध्याकाळी ४ वाजता परत आले असता त्यांना त्यांची मोटारसायकल गायब झाल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास सुरू आहे.
गोव्याची लुबाडलेली जमीन आणि वळवलेली म्हादई नदी आम्हाला परत द्या, असे प्रतित्युत्तर मनोज परब यांनी कन्नड नेते मेटी यांना दिले आहे. कर्नाटक गोव्याच्या तुलनेत ५२ पटीने मोठे आहे, मग मेटी गोव्याला कर्नाटकमध्ये ५२ पट जागा देतील का? असा सवालही परब यांनी उपस्थित केला. गोव्यात आम्हाला गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नको आहेत, असे परब म्हणाले.
म्हावळींगे येथील दोन वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणाला वेगळे वळण. ह्या प्रकरणी 'मास्टरमाईंड' आरोपीला डिचोली पोलिसांकडून अटक. बंगळूर येथे घेतले ताब्यात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.