Goa Live Breaking News Dainik Gomantak
Live Updates

Goa News: आग लागलेली असतानाच लुथरा बंधूंनी थायलंडचे केले तिकीट बुक

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या बातम्या मराठीमध्ये.

गोमन्तक डिजिटल टीम

Indigo Flight Update: गोव्यातून इंडिगोच्या 7 फेऱ्या रद्द

गोव्यातून इंडिगोच्या 38 फेऱ्यांपैकी 7 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. याबाबतची अपडेट भारतीय विमान प्राधिकरणने दिली आहे.

Goa Crime: 11 लाखांच्या अंमली पदार्थासह 44 वर्षीय व्यक्तीला अटक  

गुन्हा शाखेने कलंगुट येथे 11 लाखांच्या अंमली पदार्थसह 44 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

'ती' आस्थापने करणार बंद!

रोमियो लेन आग प्रकरणास जबाबदार असलेल्यांवर कारवाया सुरूच आहेत. आतापर्यंत ६ जणांना अटक. पर्यटनाशी संबंधित ज्या आस्थापनांनी अग्निसुरक्षेचे नियम पाळलेले नाहीत, त्यांची आस्थापने काही दिवसांसाठी बंद करणार : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

'त्या' अधिकार्‍याला अटक होणार

रोमियो लेन प्रकरणी जो अधिकारी चौकशीसाठी येत नाही त्याला अटक होणार. आतापर्यंत तीन अधिकारी निलंबित. दोघांची चौकशी सुरू : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

सेंट अँथनी चॅपलमध्ये तोडफोड; सीसीटीव्ही फुटेजवरून नौदल कर्मचारी नवनीत सिंगला अटक

बुधवारी सकाळी सेंट अँथनी चॅपलमध्ये तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी वास्को पोलिसांनी नवनीत सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. सिंग हा नौदलाचा कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला पकडले.

'दिल्ली भेटीचा' व्हायरल फोटो खरंतर 'प्रँक'! मनोज परब यांचा खुलासा

रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे अध्यक्ष मनोज परब यांनी दिल्ली भेटीचा व्हायरल झालेला फोटो एक गंमत म्हणून शेअर केल्याचा खुलासा केला आहे. परब यांनी सांगितले की, "मी आणि आमदार विरेश बोरकर यांनी २२ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईला जात असताना विमानात हा फोटो काढला होता." याच जुन्या फोटोचा वापर २३ नोव्हेंबर २०२५ रोजी, "आम्ही दिल्लीला जात आहोत" असे भासविण्यासाठी केला. लोकांच्या प्रतिक्रिया बघण्यासाठी हा प्रयोग केला. परब यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनाही फोन करून हा फोटो जुना असून, आपण कुठेही जात नसल्याचे स्पष्ट केले.

आग दुर्घटनेचा धडा! बागा-कळंगुट परिसरातील क्लबमध्ये सुरक्षा तपासणी सुरू

हडफडे येथील नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण आग दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, आता बागा आणि कळंगुट या महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्रातील नाईट क्लबमध्ये सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

'दोषी कितीही मोठा असो, त्याला सोडणार नाही'; भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे आश्वासन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी 'बर्च' नाईट क्लबमधील दुर्घटनेला दुर्दैवी म्हटले. याप्रकरणी दोषी असलेले लोक कितीही मोठे असले तरी, त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. नाईक यांनी सांगितले की, सरकार तपासाच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच, नियमांचे कथित उल्लंघन होऊन अशा आगीच्या घटनांमुळे गोव्याची प्रतिमा मलिन होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तपासामध्ये कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा आयपीएस अधिकाऱ्याचा सहभाग आहे का, असे विचारले असता, त्यांनी जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कारवाई होईल या विधानाची पुनरावृत्ती केली.

झेडपी वेचणूकेत घाटीयांची मतां चलता?

'इंडिगो संकटा'तही दाबोळी विमानतळाचे सुरळीत कामकाज; वाढीव कर्मचारी, गर्दी व्यवस्थापन आणि MoCA कडून कौतुक

विमानतळ ऑपरेटरने सर्व भागधारकांसोबत समन्वय साधून, 'इंडिगो संकटाच्या' काळातही विमानतळाचे कामकाज सुरळीत ठेवले. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, गर्दीचे व्यवस्थापन, स्वच्छता, प्रवाशांना मदत आणि वास्तविक-वेळात माहितीचे अद्ययावत करणे सुनिश्चित केले गेले. यादरम्यान, प्रथमोपचार (first-aid), व्हीलचेअर्स (wheelchairs) आणि शिशु-काळजी (baby-care) यांसारख्या सुविधा अखंडपणे पुरवल्या गेल्या. ९.१२.२०२५ रोजी भेट दिलेल्या नागरी उड्डाण मंत्रालयाने (MoCA) या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. पूर्व-नियोजित रद्द झालेल्या उड्डाणांव्यतिरिक्त, सध्या कामकाज सामान्य आहे.

25 जणांचा जीव गेला यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री जबाबदार

25 जणांचा जीव गेला यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत जबाबदार आहेत:अमित पालेकरांचा आरोप

आग लागलेली असतानाच लुथरा बंधूंनी थायलंडचे केले तिकीट बुक

बर्च बाय रोमिओ लेन' आग दुर्घटनेच्या तपासात गोवा पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. ७ डिसेंबरच्या रात्री क्लबला आग लागल्यानंतर अवघ्या काही वेळात, पहाटे १:१७ वाजता लुथरा बंधूंनी एमएमटी प्लॅटफॉर्मवरून थायलंडची तिकिटे बुक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT