Goa Today's News Live Update's In Marathi Dainik Gomantak
Live Updates

Goa Live Updates: सासमोळे-बायणा नाल्याच्या कामास सुरुवात

Goa Today's News Live Update's In Marathi: गोव्यातील राजकीय, गुन्हे, कला - क्रीडा - संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.

Sameer Amunekar

Vasco: सासमोळे-बायणा नाल्याच्या कामास सुरुवात

वास्को: वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्या हस्ते सासमोळे-बायणा येथे दीर्घकाल प्रलंबित असलेल्या नाल्याच्या कामाचा शुभारंभ झाला. सुमारे ४० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पावसाळ्यातील पाणी साचणे व पूर परिस्थिती टाळता येणार आहे. हा प्रकल्प जलसंपदा विभागाअंतर्गत राबवला जात असून, परिसरातील ड्रेनेज व स्वच्छता व्यवस्था सुधारण्याची अपेक्षा आहे. साळकर यांनी सांगितले की, पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यास मदत होईल आणि आरोग्यावर होणारा परिणामही टळेल.

Molem: मोले पंचायत उपसरपंचपदी प्रणाली द.वेरेकर यांची बिनविरोध निवड

मोले पंचायत उपसरपंचपदी प्रणाली द.वेरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.निर्वाचन अधिकारी म्हणून देऊ माईणकर उपस्थित होते.

CM Pramod Sawant: सरकारी जमीन विकत घेताना किंवा घर बांधताना विचार करा - मुख्यमंत्री

सरकारी जमीन विकत घेताना किंवा घर बांधताना विचार करा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सल्ला, 'माझे घर' योजनेंतर्गत डिचोलीत अर्ज वितरीत करण्याच्या कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.

Karnataka Govt: कळसाला मंजुरी देण्‍यास कायदेशीर अडथळा नाही, कर्नाटक सरकारचं स्पष्टीकरण

म्‍हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजुरी देण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नसल्‍याचे कर्नाटक सरकारने पुन्‍हा एकदा केंद्र सरकारसमोर नमूद केले. पर्यावरण मंत्रालयाने कळसा–भांडुरा प्रकल्‍पाबाबत कर्नाटकला तपशीलाबाबत पत्र पाठवले होते. त्‍या पत्राला कर्नाटकने काहीच दिवसांपूर्वी दिलेल्‍या उत्तरात कळसा–भांडुराला मंजुरी देण्‍यास कोणताही कायदेशीर अडथळा नसल्‍याचे म्‍हटले आहे. गोव्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डननी २९ मार्च २०२३ रोजी काम रोखण्याचा जो आदेश दिला होता.

Mayem: 'माझे घर' योजनेंतर्गतच्या अर्ज वितरणाला मयेतून शुभारंभ

गोव्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले की, घरदुरुस्ती आणि विभाजन प्रक्रिया आता अधिक सूटसुटीत आणि सोपी केली जाणार आहे. प्रशासनातील गुंतागुंत कमी करून नागरिकांना सुलभ सेवा देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'माझे घर' या योजनेअंतर्गत अर्ज वितरण कार्यक्रमाला मये येथे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला

Goa Crime: नेसाय येथे ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २० जणांना अटक, ४.४ लाख रुपये रोख जप्त

मायणा-कुडतरी पोलिसांनी नेसैया गेटजवळील साओ होजे दे एरियल परिसरातील एका बंद घरावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २० जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४.४ लाख रुपये रोख, चार टॅब्लेट, एक राउटर आणि एक मोडेम जप्त करण्यात आले आहेत.

Molem: मोले चेकपोस्टजवळ तीन टन गोमांस जप्त; कुळे पोलीसांचा तपास सुरू

मोले चेकपोस्टपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर गोमांस सापडल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीच्या बागायतीत अंदाजे तीन टन गोमांस ठेवण्यात आले होते. ग्रामस्थांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी कुळे पोलीस दाखल झाले असून त्यांनी गोमांस आणि त्या ठिकाणी असलेली एक रिक्षा ताब्यात घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NH 66 Closure: 'ट्रायल रन' फेल! सर्व्हिस रोडवरील गर्दीने पर्वरी हँग; चालकांनी व्यक्त केला तीव्र संताप

World Cup 2025: भारतीय महिला संघासमोर 'करो या मरो'ची स्थिती! सेमीफायनलचे दार उघडणार की बंद होणार? 2 पराभवांनंतरही संधी? वाचा संपूर्ण गणित

Horoscope: 'महादेवाचा दिव्य आशीर्वाद 'या' 3 राशींच्या डोक्यावर: सोमवारी दूर होतील जीवनातील सर्व समस्या; वाचा दैनिक राशिभविष्य

Babasaheb Ambedkar Statue: चोपडे सर्कलजवळ उभारणार डॉ. आंबेडकरांचा भव्‍य पुतळा! आमदार आरोलकर यांची घोषणा

Serendipity Festival: नृत्य, नाट्य आणि संगीत आणि दृश्यकलांचा उत्सव! वेध सेरेंडीपिटीचे..

SCROLL FOR NEXT