कळंगुट येथे निष्काळजीपणे वाहन हाकून अपघातानंतर जखमींना उपचाराची व्यवस्था किंवा पोलिसांना माहिती न पुरविताच, घटनास्थळावरून पळ काढल्याप्रकरणी पोलिसांनी विजय सोनू बुरूड (रा. ठाणे, मुंबई) या बीएमडब्ल्यू कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नावेली येथे मटका घेताना मडगाव पोलिसांनी दोघांना पकडले. जितेंद्र कुमार व बाबूश हरिजन अशी संशयितांची नावे असून, अटक करून नंतर त्यांना जामिनावर सोडले. जितेंद्रकडे १,४१० तर बाबूशकडे ५३० रुपये सापडले. जुगार प्रतिबंधात्मक कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
साळावली येथील जलशुद्धीकरण प्रकल्प आणि जलवाहिनी प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम १३ ऑक्टोबर रोजी हाती घेण्यात येणार होते. मात्र, सोमवारी कोलवा येथे प्रसिद्ध फाम उत्सव असल्याने आता मंगळवारी (ता. १४) हे काम करण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामानिमित्त प्रकल्प १४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याने १४ व १५ रोजी मर्यादित पाणी राहील.
धारगळ येथील आयुष रुग्णालयात रविवारी सकाळी लागलेल्या आगीची घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर वॉशिंग मशीन वापरत असताना शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रामा काणकोणकर यांचे आरोप तथ्यहिन आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिमा मलिन करण्याचे काणकोणकरांचे प्रयत्न असल्याचं दामू नाईक यांनी म्हटलंय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.