डिचोली विभाग वाहतुक खात्यातर्फे व सत्तरी पत्रकार संघाच्या सहकार्यातून आज बुधवारी सायंकाळी वाळपईतील १७ मोटार सायकल पायलटांना मोफत हेल्मेट वितरण करण्यात आले. यावेळी डिचोलीचे वाहतूक उपसंचालक संदीप पारोडकर, आरटीओ अधिकारी शिवानंद पेडणेकर , मिथून रामनाथकर, रवींद्र सातार्डेकर, वाळपई भाग शिक्षणाधिकारी प्रसाद पर्येकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास गावकर उपस्थित होते.
कुर्टी येथील वीज खात्याच्या उप-विभागात लागली आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज.
गावणे-बांदोडा येथील पूर्वाचारी मंदिराजवळील संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू झाल्यामुळे, फोंडा-मडकई मार्गावरील वाहतूक पुढील १० दिवस उंडीर मार्गावर वळविण्यात येणार. वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षापासून सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीत प्रवेश मिळणार. त्यामुळे गोव्यात सुमारे ४ हजार नवीन भरतीत घट होण्याची शक्यता आहे. परंतु ही तूट २०२७ पासून जाग्यावर येणार. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. ग्रामीण भागातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये स्थानिकांची मुले कमी व बिगरगोमंतकीय मुले जास्त भरती होता आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली खंत
दुधसागर पर्यटनास आजपासून सुरुवात. मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ११ दिवसांची वेळ मागितली आहे. मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत ऑफलाईन सोडण्यासाठी सरकारने परवानगी घ्यावी, अशी सभेत मागणी करण्यात आली.
गोव्याची ओळख ही एकता आणि शांततेसाठी आहे, सर्वांनी त्याच मार्गावर चालावे. विविध धर्माचे लोक राज्यात गुण्यागोविंदाने नांदतात पण, राजकीय फायद्यासाठी काहीजण नागरिकांध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताहेत. पण, सर्वांनी एकत्र उभं राहायला हवं, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
दसरोत्सवानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या निवासस्थानी वाहनांची पूजा केली. दसरोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत खुप नवनवीन गोष्टींचा सरकारतर्फे शुभारंभ या दसरोत्सवातून होणार असल्याचे सांगितले.
हणजूण येथे समुद्रात रात्रीच्या सुमारास एकजण बुडाल्याची घटना घडली. रात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. समुद्र खवळलेल्या असल्याने व्यक्तीचा शोध घेण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येत आहेत. सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.