Arrest Dainik gomantak
गोवा

Goa News: हणजूण येथे 19 वर्षीय तरुणाला 3 किलो गांजासह अटक, वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi News : जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Sameer Panditrao

Goa Drug Case: हणजूण येथे 19 वर्षीय तरुणाला 3 किलो गांजासह अटक

अंजुना पोलिसांनी गुरुवारी पहाटे अंजुना येथील रॉकी गॅरेजजवळ मोठा छापा टाकला आणि तिथून १९ वर्षीय बापी मंडलला अटक केली. आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. पोलीसांनी तपासादरम्यान बापी मंडलच्या ताब्यातून सुमारे ३ किलो गांजा जप्त केला, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे ३ लाख रुपये आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून १.५८ लाख रुपयांची रोकड देखील हस्तगत करण्यात आली.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी सर्व 8 संघांची घोषणा

आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी स्पर्धेत ८ संघ सहभागी होत आहेत, ज्यांना २ गटात विभागण्यात आले आहे. गट-अ मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमानचे संघ आहेत, तर गट-ब मध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि हाँगकाँगचे संघ आहेत.

AFC Asian Cup 2025: मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगणार भारत आणि सिंगापूर सामना

एएफसी आशियाई कप २०२७ च्या अंतिम फेरीतील पात्रता गट क मधील यांच्यातील सामना १४ ऑक्टोबर रोजी गोव्यातील मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे.

Kulem: कुळे येथील मुस्लिम बांधवांच्या जुलूस रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली

कुळे येथे मुस्लिम बांधवानी जुलुस उत्सवसाठी रॅली काढण्यास मागितलेली परवानगी अखेर जिल्हाधिकारी यांनी नाकारली.यापूर्वी कुळे शिवसाम्राज्य व बजरंग दल यांनी रॅलीला विरोध दर्शविला होता. कुळे गावात आम्ही अन्य दिवशी शांततेत रॅली काढणारच, असा दावा मुस्लिम बांधवांनी केलाय.

Vagator: वागातोरला होडी उलटली; तिघांना वाचवले

मासेमारी करण्यासाठी गेलेली होडी वागातोर येथील खवळलेल्या समुद्रात उलटून बुडाली. या होडीत असलेल्या राज चोडणकर (शिवोली), आकाश एक्का व संजय सेक्का (छत्तीसगढ) यांनी वेळीच समुद्रात उड्या घेत मदतीसाठी आरडाओरडा केला.

Bits Pilani Death: बिट्स पिलानीमध्ये आणखी एका विद्यार्थ्याने संपवले जीवन

बिट्स पिलानीमध्ये आणखी ऋषी नायर या विद्यार्थ्याने संपवले जीवन. वर्षभरातील एकूण पाचवी घटना.

Goa Rain: 4, 5  सप्टेंबर रोजी राज्यात यलो अलर्ट जारी

४, ५ सप्टेंबर रोजी हवामान खात्याने राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे. हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.

Karul Ghat Landslide: करूळ घाटात दरड कोसळली, गोवा -कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प

करूळ घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता खुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

Anmod Ghat: अनमोड रस्ता अवजड वाहनांसाठी १५ सप्टेंबरपासून खुला

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित रस्ता विभागाला हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी १० दिवसांचा अवधी दिला असून रस्त्याची सर्व कामे पूर्ण करून येत्या १५ सप्टेंबरपासून अनमोड मार्गे रस्ता अवजड वाहनांसाठी खुला करणार असल्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी सांगितले.

पणजीतील जुनी इमारत सील, हायकोर्टाने गोवा सरकारला फटकारले

पणजीतील जुना हायकोर्ट इमारतींना सील केल्याप्रकरणी बॉम्बे हायकोर्टाने गोवा सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. न्यायालयाने सरकारला सुनावले, “तुम्हाला हायकोर्टच्या इमारतीत शिरण्याचा किंवा तिला कुलूप लावण्याचा काहीही अधिकार नाही.”

Goa News: जाणून घ्या गोव्यातील महत्वाच्या घडामोडी

जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT