Marathi breaking news Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News: फोंडा येथील धोकादायक स्थितीत असलेल्या मार्केट इमारतीची नवीन मार्केट प्रकल्पात स्थलांतर करण्यात सुरुवात

Goa Marathi Latest News Today 3 September 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Sameer Panditrao

फोंडा येथील धोकादायक स्थितीत असलेल्या मार्केट इमारतीची नवीन मार्केट प्रकल्पात स्थलांतर करण्यात सुरुवात

फोंडा येथील धोकादायक स्थितीत असलेल्या मार्केट इमारतीच्या काही विक्रेत्यांनी नवीन मार्केट प्रकल्पात स्थलांतर करण्यात केली सुरुवात. उर्वरित विक्रेते लवकरच करणार स्थलांतर. चतुर्थी पूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चतुर्थी नंतर स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होते. विक्रेत्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिलेले आश्वासन पाळत आहे. विक्रेत्यांनी मुख्यमंत्री, पालिकेचे मुख्ययाधिकारी व नगराध्यक्ष यांचे आभार मानले आहे. नविन मार्केट प्रकल्पात धोका पत्करून विक्रेत्यांनी स्थलांतर केले असून पालिकेने पूर्ण सहकार्य करण्याची मागणी विक्रेते करीत आहे

कोडार-बेतोडा येथील कुडाळकर कुटुंबियांतर्फे यंदा १५० वी गणेश चतुर्थी साजरी

कोडार-बेतोडा येथील कुडाळकर कुटुंबियांतर्फे यंदा १५० गणेश चतुर्थी साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ९ दिवस गणेश पूजन करण्यात येत आहे. अनेक स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळकर कुटुंबात अंदाजे १०० पेक्षा अधिक सदस्य आहे. कुडाळ (महाराष्ट्र) गावातून गोव्यात कामासाठी आलेल्या पूर्वजानी कोडार येथे येऊन गणेश पूजन केले होते. त्यानंतर आजच्या पिढी पर्यंत गणेश पूजन करीत आहे.

जर गोव्याच्या लोकांना फायदा होत असेल तर ते डबल ट्रॅकिंगला समर्थन

भाजपच्या फेसबुक पेजवर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आप गोवा अध्यक्ष अमित पालेकर म्हणाले की जर गोव्याच्या लोकांना फायदा होत असेल तर ते डबल ट्रॅकिंगला समर्थन देतात परंतु जर ते कोळसा वाहतुकीसाठी असेल तर ते त्याला विरोध करतील

पेडणेचा राजा : पाण्यावर तरंगणाऱ्या पाषाणी मंदिराचा अद्वितीय गणेश देखावा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीला उपस्थिती लावली

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या ५६ व्या बैठकीला उपस्थिती लावली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतली मंत्री श्री. एच. डी. कुमारस्वामी यांची भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री श्री. एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेतली.

"तुमी जाय तें छापा"

वादग्रस्त मुद्द्यांवर मी कोणतेही विधान करणार नाही, "तुम्ही जाय तें छापा"; दुहेरी ट्रॅकिंगवर मंत्री दिगंबर कामत.

क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनी साधला क्रीडा विभागाच्या कर्मचाऱ्यांशी पहिला अधिकृत संवाद

क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनी आज क्रीडा विभागाच्या कर्मचाऱ्यांशी पहिला अधिकृत संवाद साधला. राज्यातील क्रीडा परिसंस्था मजबूत करण्यासाठी सहयोगी आणि कामगिरीवर आधारित दृष्टिकोनाची सुरुवात या बैठकीत झाली

भोम अडकोण पंचायतीचे सरपंचेपदी सुनील जल्मी बिनविरोध

भोम अडकोण पंचायतीचे सरपंचेपदी सुनील जल्मी यांची बिनविरोध निवड. सुनील नाईक यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत केल्यानंतर सरपंचपद झाले होते रिक्त.

दुहेरी ट्रॅकिंगच्या मुद्द्यावर ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला काँग्रेसचा निषेध

दुहेरी ट्रॅकिंगच्या मुद्द्यावर दुहेरी निकष स्वीकारल्याबद्दल ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसचा निषेध केला. ते म्हणतात की या प्रकल्पाचा डीपीआर काँग्रेस सरकारच्या काळात मंजूर झाला होता

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. लेविन्‍सन मार्टिन्स नियुक्त

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. लेविन्‍सन मार्टिन्स हे आयएएस अधिकारी सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत. आज राज्य सरकारने त्यांची त्या पदावर नियुक्ती केली आहे.

Ponda: विरेंद्र ढवळीकर होणार फोंड्याचे नगराध्यक्ष

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हांच्या उपस्थितीत झालेल्या फोंडा पालिकेच्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीत नगराध्यक्षपदी विरेंद्र ढवळीकरांच्या नावावर शिक्कामोर्तब. मंत्री रवी नाईक गटावर विश्वनाथ उर्फ अपुर्व दळवींची मात.पुढच्यावेळी रॉय व शौनक बोरकर ह्या नावांचा होणार विचार.

Anmod Ghat: अनमोड घाट रस्ता दुरुस्ती संथगतीने सुरू

अनमोड राष्ट्रीय महामार्ग कोसळून आज दोन महिने पूर्ण झाले. परंतु दुरुस्तीचे काम अद्याप संथगतीने सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अवजड वाहनांवरील बंदी आणखी दोन महिने वाढवावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.

Digambar Kamat: मंत्री दिगंबर कामत घेणार खात्यांचा ताबा

सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत हे आपल्या खात्यांचा ताबा उद्या बुधवारी ३ सप्टेंबर रोजी घेणार आहेत.

Goa Beach: 20 किनाऱ्यांवर होणार स्वच्छता जागरूकता

आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दलातर्फे २० सप्टेंबर रोजी बायणा, बोगमाळो, कोलवा, बाणावली, वेल्साव, माजोर्डा, बेतालबाती, वार्का, मोबोर, बेतूल, उतोर्डा, बागा, मिरामार, सिरिदोना, अरंबोल, मोरजी, वागातोर, अंजुना, कळंगुट, कांदोळी आदी २० किनाऱ्यांवर जागरूकता मोहीम राबविण्यात येणार आहे. यात केंद्र, राज्य सरकारचे विविध विभाग, खासगी कंपन्या, विविध संस्था आदी सहभागी होणार आहेत.

Bicholim Jama Masjid: मशिदीच्या कुंपणासंबंधी बेकायदा काहीच नाही, अध्यक्षासह मुस्लिम बांधवांचा दावा

मशिदीच्या कुंपणासंबंधी बेकायदा काहीच नाही अन् वादही नाही. डिचोलीच्या आझाद जामा मशीद समितीच्या सचिवांनी केलेले आरोप दिशाभूल करणारे. त्यांच्याकडूनच कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न. मशीद समिती अध्यक्षासह मुस्लिम बांधवांचा दावा.

CM Pramod Sawant Delhi Visit: मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुन्हा दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. तिथे त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025: आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, मलेशियाचा 4-1 नं केला पराभव

Dharbandora Accident: धारबांदोड्यात दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जखमी

GST 2.0: दूध, औषधं, शालेय साहित्य, विमा... 'या' सेवा आणि वस्तूंवर आता 0% जीएसटी, पाहा संपूर्ण यादी

BITS Pilani: नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू; बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशीची मागणी

ODI World Cup 2025: एकदिवसीय विश्वचषक तोंडावर असताना टीम इंडियाला तगडा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

SCROLL FOR NEXT