गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या युनिटी मॉल प्रकल्पाला विरोध करणारे चिंबेल ग्रामस्थ रविवारपासून उपोषण सुरू करतील आणि बांधकाम परवाना जारी करण्यासाठी उद्या ग्रामपंचायतीला घेराव घालतील.लोकांचा युनिटी मॉलला पूर्णपणे विरोध असलेचे लोकांनी सांगितले
चिंबल येथील टोय्यार तलाव आणि आसपासच्या संवेदनशील क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या 'युनिटी मॉल' आणि 'प्रशासन स्तंभ' या भव्य प्रकल्पांविरुद्ध स्थानिक ग्रामस्थांनी आता निर्णायक लढाई पुकारली आहे. वारंवार विरोध करूनही सरकार प्रकल्पावर ठाम असल्याने, संतापलेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचे पुढचे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे.
करंझाळे येथून दुचाकी चोरल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी ताळगाव येथील जेडन सोझा (१९) आणि गौरक्ष गावस (१९) यांना अटक केली आहे. करंझाळे येथील रहिवासी सांतानो फर्नांडिस यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार १६ डिसेंबर रोजी पहाटे ३.१५ च्या सुमारास त्यांच्या घरासमोर उभी केलेली काळ्या रंगाची दुचाकी अज्ञात चोरांनी पळवून नेली.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून पोलिसांनी ताळगाव परिसरातून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सतीश माजे करत आहेत. अटक केलेल्या दोन्ही संशयितांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून या अर्जावर २६ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
रेवोडा येथील नाल्यातील सहा ते सात फूट लांब मगरीला स्थानिकांनी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले. मगरीला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी उसळली होती. शापोरा नदीच्या पात्रातून नाल्यात (पोंय) साधारण पाच तास एकाच जागी ठाण मांडून राहिलेली मगर स्थनिकांच्या नजरेस येताच त्यांनी वन खात्याला फोन करून कळविले.
त्यानंतर वन खात्याच्या बचाव पथकातील वनरक्षक हरीष महाले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक देविदास खरपालकर, विराज परवार, बुधाजी हसापूरकर, अनिकेत च्यारी, सिध्देश गावस, राहुल गाड, विशाल वायंगणकर, समीर सातार्डेकर तसेच इतरांनी स्थानिकांच्या साहाय्याने मगरीला पकडून घेऊन गेले.
राज्यात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची तीव्रता वाढल्याने मागील दोन-तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. बुधवारी (ता.२४) १८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. जी सामान्य तापमानाच्या तुलनेत -२.२ अंश सेल्सिअस घट होती. पुढील चार दिवस राज्यात थंडी कायम राहणार असून पारा १८ ते १९ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २७ व २८ डिसेंबर रोजी गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्ताने हवाई छायाचित्रण, ड्रोन उडवणे यावर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.
इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा १३ मार्च २०२६ पासून सुरू होणार असून, ती ९ एप्रिलपर्यंत चालेल, असे वेळापत्रक राज्य शालान्त मंडळाने आज बुधवारी जारी केले. पाचवी ते नववीपर्यंतच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतरच दहावीची अंतिम परीक्षा घेण्यात यावी, अशी विनंती मुख्याध्यापक संघटनेने केली होती. त्याचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक यांनी पत्रकात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.