Goa Live Updates Dainik Gomantak
Live Updates

Goa Live Updates: 'कळंगुटचे नाव खराब करण्यासाठी रचलेला पूर्वनियोजित कट', कळंगुटच्या सरपंचांची 'त्या' वादावर प्रतिक्रिया

Goa Marathi Latest News Today 22 August 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, मनोरंजन, क्रीडा, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

Sameer Panditrao

'कळंगुटचे नाव खराब करण्यासाठी रचलेला पूर्वनियोजित कट',  कळंगुटच्या सरपंचांची 'त्या' वादावर प्रतिक्रिया

पुण्याच्या एका तरुणाला पार्किंगचे चलन दिल्याच्या घटनेवरुन सोशल मीडियावर निर्माण झालेल्या वादावर कळंगुटच्या सरपंचांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला ‘कळंगुटचे नाव खराब करण्यासाठी रचलेला पूर्वनियोजित कट आहे’ असे म्हटले.

सरपंच म्हणाले की, या वादातील तरुणाला वाहतूक पोलीस किंवा पंचायत अधिकाऱ्यांचा परवाना मागण्याचा कोणताही अधिकार नव्हता. ‘त्या व्यक्तीने आधी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आणि नंतर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक अधिकाऱ्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले,’ असे ते म्हणाले.

टॅक्सीसाठी लवकरच नवीन धोरण! 'डिजिटल प्लॅटफॉर्म आणि समान दरांवर ऑपरेटर सहमत' - आमदार मायकल लोबो

गोव्यातील टॅक्सी व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी लवकरच एक नवीन धोरण तयार केले जाणार आहे, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली आहे. टॅक्सी ऑपरेटर आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका यशस्वी बैठकीनंतर ते बोलत होते. या नवीन धोरणामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मचा समावेश असेल, ज्यामुळे व्यवसायात अधिक पारदर्शकता येईल, असे त्यांनी सांगितले.

New Guidelines on Stray Dogs: भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. भटक्या कुत्र्यांना आधी लस दिली जाईल आणि त्यानंतरच सोडले जाईल. कोणतेही आक्रमक किंवा रेबीजग्रस्त कुत्रे रस्त्यावर सोडले जाणार नाहीत. भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर थेट खायला देण्यावर बंदी घातली जाणार तसंच रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल.

Goa Politics: रवी नाईक यांना गृहमंत्रीपदी परत आणा - विजय सरदेसाई

पोलिस खात्यात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. सत्ताधारी पक्षाच्या निर्देशांचे पालन करण्यास नकार देणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांना बाजूला केले जात आहे. गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे आणि गुन्हेगारांनाही माहिती आहे की, पोलिसांवर नियंत्रण ठेवता येते. परिस्थिती इतकी वाईट आहे की, स्वतः पोलिसही सुरक्षित नाहीत. मी महासंचालकांना हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची विनंती करतो. रवी नाईक यांना गृह खात्यात परत आणण्याची वेळ आली आहे - आमदार विजय सरदेसाई

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री माझे घर योजनेवर संवाद साधणार

स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत माझे घर योजना आणि महसूल विभागातील सुधारणांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवारी (२३ ऑगस्ट) सकाळी १०:३० वाजता स्वयंपूर्ण गोवा या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. सर्वसामान्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन महसूल खात्याच्या संयुक्त सचिवांनी केले आहे

Goa Taxi: प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी 1000 हून अधिक टॅक्सी ऑपरेटर्स मंत्रालयापाशी जमले

प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री मौविन गोडिन्हो यांच्याशी चर्चा करण्यासाठी 1000 हून अधिक टॅक्सी ऑपरेटर्स मंत्रालयापाशी जमले आहेत

Anjuna: चालत्या गाडीत पर्यटकाचा डान्स

हणजूण परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. चालत्या गाडीत एक पर्यटक जीवाशी खेळ करत नाचताना दिसून आलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.

FDA Raid:  १७५० किलो चिकन व ५०० किलो पनीर जप्त

केरी, पत्रादेवी व मोले चेकनाक्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा मारून निकृष्ट दर्जाचे १७५० किलो चिकन व ५०० किलो पनीर जप्त. कर्नाटक राज्यातून आलेल्या दोन वाहने अडवून केली कारवाई.

Goa Crime: मडकई येथील इनोव्हा कारवर गोळीबार

मडकई येथील इनोव्हा कारवर गोळीबार. म्हार्दोळ पोलिसांनी केला अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद. गुरुवारी रात्रीची घटना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Digital Taxi Policy: गोव्यात लवकरच नवीन 'टॅक्सी धोरण', 10 सप्टेंबरपर्यंत मसुदा तयार करण्याचे मुख्यमंत्री सावंतांचे निर्देश; बैठकीनंतर अखेर तोडगा

Rohit Sharma: 'अनुभव हीच त्याची सर्वात मोठी ताकद, रोहित असा लीडर आहे...' राहुल द्रविडकडून 'मुंबईच्या राजा'वर स्तुतीसुमनांचा वर्षाव

Sachin Tendulkar In Goa: 'क्रिकेटचा देव' गोव्यात, काणकोणात क्रीडांगणाचं केलं उद्‌घाटन, विद्यार्थ्यांशीही साधला संवाद

काँग्रेस आमदाराच्या गोव्यातील कॅसिनोंवर ईडीचे छापे; पहाटे पाचपासून झाडाझडती सुरु

Navpancham Rajyog 2025: 27 ऑगस्टपासून 'या' राशींसाठी 'शुभ काळ' सुरू, शुक्र बनवणार शक्तिशाली राजयोग; आर्थिक लाभ होणार

SCROLL FOR NEXT