Goa News Live Updates Dainik Gomantak
Live Updates

Goa Live Updates: म्हाऊस पंचायतीच्या सरपंचपदी प्रीती प्रताप गावकर

Goa Marathi Latest News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण,क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

Sameer Panditrao

म्हाऊस पंचायतीच्या सरपंचपदी प्रीती प्रताप गावकर

पर्ये मतदारसंघातील म्हाऊस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. प्रीती प्रताप गावकर यांची बिनविरोध निवड झाली. निवड प्रक्रियेदरम्यान सर्व पंच सभासद उपस्थित होते.

Gold Chain Snatched in Raia: राय येथे घरात घुसून महिलेची सोनसाखळी हिसकाविली

राय येथील एका घरात एका अज्ञात व्यक्तीने घुसून एका महिलेची २० ग्रॅम वजनाची १ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावली. घटनेनंतर आरोपी लगेचच घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Goa Rain: तीन दिवस राज्‍यात मध्‍यम पाऊस

येत्‍या शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्‍यात मध्‍यम स्‍वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवत राज्‍य हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यंदाच्‍या मान्‍सून हंगामात १ जून ते ११ सप्‍टेंबर या काळात राज्‍यात ११६ इंच पावसाची नोंद झाली आहे. या काळात सरासरी १११.३१ इंच पावसाची नोंद होते. त्‍यामुळे यंदाचा पाऊस सरासरीच्‍या ४.२ टक्‍के इतका अधिक आहे.

मान्‍सून हंगाम सुरू झाल्‍यानंतर सुरुवातीच्‍या काही दिवसांत सातत्‍याने कोसळलेल्‍या पावसाने मध्‍यंतरीच्‍या काळात विश्रांती घेतली.

पणजीत ३० रोजी टपाल अदालत

भारतीय टपाल विभागाच्या गोवा क्षेत्रातील, पणजतील पोस्टमास्टर जनरल कार्यालयाच्यावतीने येत्या ३० सप्टेंबर रोजी ६३ व्या क्षेत्रीय स्तरावरील टपाल अदालतीचे आयोजन केले आहे.

येथील मुख्य कार्यालयात सकाळी ११ वाजता ही टपाल अदालत होणार आहे. गोवा क्षेत्राशी संबंधित टपाल सेवांबाबतच्या ज्या तक्रारी सहा आठवड्यांत सोडवल्या गेल्या नाहीत, अशा तक्रारी या टपाल अदालतीत हाती घेतल्या जाणार आहेत. या लोक अदालतीमध्ये टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डरच्या न भरलेल्या पेमेंटसंबंधीच्या तक्रारी देखील हाती घेतल्या जाणार आहेत.

Goa Accident: शेल्डे येथे स्विफ्ट कार आणि ट्रक यांच्यात अपघात

शिवनगर, शेल्डे येथे स्विफ्ट कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली, ज्यामुळे दोन्ही वाहनांना हानी झाली आणि कार चालकाला सौम्य जखमा झाल्या. केपे पोलिस घटनास्थळी पंचनाम्याची तयारी करत आहेत, तर पुढील तपास सुरू आहे.

MRF Job Fair: गोव्यातील विरोधानंतर एमआरएफकडून सिंधुदुर्गमधील नोकरी मेळावा रद्द

गोव्यातील जनतेचा व विरोधी पक्षांचा विरोध लक्षात घेऊन एमआरएफ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मनसे अध्यक्ष धीरज परब यांना ईमेलद्वारे कळविले आहे की महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे होणारा नियोजित नोकरी भरती कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Doctor Suspension: हेल्थवे डॉक्टर लैंगिक अत्याचार तक्रारीनंतर निलंबित

हेल्थवे हॉस्पिटल्सने आपल्या रुग्णाकडून आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर डीएनबी विद्यार्थी डॉ. व्ही. दोशी यांना निलंबित केले आहे. पीडितेला उपचार सुरू असून तिला संपूर्ण नैतिक व आवश्यक सहकार्य दिले जाईल, असे हॉस्पिटलने स्पष्ट केले. पोलिस तपास सुरू असून अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे रुग्णालयाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानविरूध्दच्या सामन्याआधीच टीम इंडियाला तगडा झटका, 'या' स्टार खेळाडूनं सोडली साथ, कारण काय?

नेपाळी नागरिकाचा गोव्यात संतापजनक प्रकार; दोन पाळीव कुत्र्यांना विष देऊन केले ठार

Delhi High Court Bomb Threat: तीन बॉम्ब ठेवलेत, थोड्याच वेळात फुटतील... दिल्ली उच्च न्यायालयाला धमकीचा मेल, पोलिस अलर्ट मोडवर

Rangoli: एक लाख रुपयांची 'रांगोळी', गोव्यात उंबरठ्यापलीकडे गेलेली कला

Rohit Sharma: वनडे रिटायरमेंटच्या चर्चेला पूर्णविराम! रोहित शर्मानं VIDEO शेअर करत दिलं मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT