Accident  Dainik Gomantak
Live Updates

Goa News: हणजूण येथील सॉल्ट रेस्टॉरंटजवळ अपघात, 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Goa Marathi Breaking News : जाणून घ्या गोव्यातील राजकारण, मनोरंजन, क्रीडा, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Sameer Panditrao

विसर्जित केलेल्या शेकडो पीओपी गणेश मूर्ती; पर्यावरणीय चिंता

तोरडा, पर्वरी येथे किनाऱ्यावर विसर्जित केलेल्या शेकडो पीओपी गणेश मूर्ती आढळल्या, ज्यामुळे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक पावित्र्याबद्दल चिंता निर्माण झाली.

करमाळी रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर अंदाजे ४० वर्षांचा एक अज्ञात पुरूष मृतावस्थेत

करमाळी रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर अंदाजे ४० वर्षांचा एक अज्ञात पुरूष मृतावस्थेत आढळला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जीएमसी येथे हलवण्यात आला आहे आणि अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

हणजूण येथील सॉल्ट रेस्टॉरंटजवळ झालेल्या एका अपघातात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यूदेवता

शनिवारी संध्याकाळी हणजूण येथील सॉल्ट रेस्टॉरंटजवळ झालेल्या एका भयानक रस्ते अपघातात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव रायन जोसेफ ज्यूड अल्मेडा असे आहे. तो हणजूण येथील येथील रहिवासी आहे. तो अंजुना येथील हडफडेहून मोटारसायकलवरून हणजूणकडे जात असताना रस्त्यात एका भटक्या गुराढोरांना धडकला.

'गणपती हा बुद्धिचा देवता.

'गणपती हा बुद्धिचा देवता. आम्ही जेव्हा त्याची मनोभावे सेवा करतो तेव्हा आम्हाला चांगली बुद्धी मिळत असते.' येथील गणेशोत्सव समितीने भरीव कार्य केले आहे पण याहीपेक्षा भरीव कार्य करावेत. पालकांनी आपल्या मुलांना काही भेट ध्यायची असेल तर त्यांना चांगले शिक्षण ध्यावे.

बोरी येथे काँक्रेटवाहू ट्रकची कारला धडक

बोरी येथे काँक्रेटवाहू ट्रकची कारला धडक. कार मधील ६ जण जखमी. तिघांना अधिक उपचारासाठी गोमेकोत केले दाखल. यात १२ वर्षीय मुलीचा समावेश. कार मध्ये ६ जण होते. त्यापैकी ४ मुलांचा समावेश. कारचे मोठे नुकसान. कार मधील सर्व प्रवासी तेलंगणा येथील आहेत.

प्रतापनगर- धारबांदोडा येथे बहीण व भावाला शिवीगाळ व मारहाण

प्रतापनगर- धारबांदोडा येथे बहीण व भावाला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध फोंडा पोलीस स्थनकात गुन्हा नोंद. शुक्रवारी रात्रीची घटना.

मुस्लिम धर्मगुरु विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला अटक करा

मुस्लिम धर्मगुरु विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला अटक करा. मागणी करीत साखळी येथील मुस्लिम बांधवांची डिचोली पोलिस ठाण्यावर धडक.

"मंदिर हे सामाजिक रीतिरिवाजांसाठी नाही" अमित पाटकर

"मंदिर हे सामाजिक रीतिरिवाजांसाठी नाहीत, तर कर्मकांडांसाठी आहेत. गोव्याच्या परंपरांचा अपमान केल्याबद्दल भाजपने माफी मागितली पाहिजे." गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर

शिरोडा येथे शुक्रवारी रात्री अंदाजे १० जणांनी ऋणाल केरकर याच्यावर हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

शिरोडा येथे शुक्रवारी रात्री अंदाजे १० जणांनी ऋणाल केरकर याच्यावर हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा नोंद. तर विवाहित महिलेने ऋणाल केरकर याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केला गुन्हा नोंद.

Goa Crime: घोगळ येथे महिलेचे सुवर्णालंकार लांबविले

दुचाकीवरून आलेल्या एकाने घोगळ येथे एका महिलेचे गळ्यातील सुवर्णलंकार हिसकावून घेऊन पळ काढला. ही घटना १८ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी तक्रारदाराने फातोर्डा पोलिस ठाण्यात  तक्रार नोंद केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. चोरीला गेलेल्या ऐवजाची किमंत ४५ हजार इतकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT