सांकवाळ येथे फ्लॅट फोडून चोरी झाल्याची घटना नोंद झाली आहे. चोरांनी दागिने आणि महाग घड्याळे असा साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
आके बायश येथील घाटमोरोड परिसरातील एका निवासी बंगल्यात पॅथॉलॉजिकल प्रयोगशाळा सुरू करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. जर निवासी परिसरात अशी प्रयोगशाळा सुरू केली तर आरोग्याला धोकादायक ठरण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
पिळगाव जेटीजवळ मांडवी नदीत डिचोलीतील युवक बुडाला. किनारी पोलिस दलाकडून शोध जारी. आत्महत्येचा संशय
येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता. राज्य हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी.
FIDE विश्वचषक २०२५ चे आयोजन हा भारत आणि गोव्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, जो जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित करण्याच्या आपल्या क्षमतेवर जागतिक विश्वास दर्शवितो. यामुळे आपल्या तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची प्रेरणा मिळते: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
२२/१०/२०२५ रोजी फातोर्डा येथील पीजेएनएस येथे होणाऱ्या एएफसी चॅम्पियन्स लीग सामन्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने तात्पुरते रस्ते बंद करण्याचे आणि वळवण्याचे आदेश जारी केले आहेत.
डॉक्टर संजय कोरगावकर यांनी दिवाळीच्या शुभेच्छासाठी लावलेले फलक त्याचे फाटण्यात आले. मागच्या वेळीही चतुर्थीच्या निमित्ताने असे फलक लावले होते. तेही फाटण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला.
गोवा फॉरवर्डचे संघटन सरचिटणीस दुर्गदास कामत यांनी पणजी येथील गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मुख्य कार्यालयात लक्ष्मी पूजन केले. पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आम्ही जोपासत आलो आहोत आणि ती पुढेही कायम ठेवत आहोत, असे गोवा फॉरवर्डचे संघटन सरचिटणीस दुर्गदास कामत यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.